नांदेड : किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील गोवंश कार्यकर्त्यांना पोलीस स्थानकात ठोणदारकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अवैधरित्या कत्तल खाण्यात जाणाऱ्या गायी अडवल्यामुळे पोलिसांकडून बेदम चोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. गोवंश कार्यकर्त्यांनी किनवट तालुक्यातील झळकवाडी व ताल्हारी गावातील गोवंश अवैधरित्या कत्तल खाण्यात जाणारा ट्रक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना एक फेब्रुवारी रोजी अडवून या मुक्या जनावरांना जीवदान दिले होते.
कार्यकर्त्यांना दिला चोप: विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, गोवंश कार्यकर्त्यांनी किनवट तालुक्यातील झळकवाडी व ताल्हारी य गावातील गोवंश अवैधरित्या कत्तल खाण्यात जाणारा ट्रक विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना एक फेब्रुवारी रोजी अडवून या मुक्या जनावरांना जीवदान दिले होते. 4 फेब्रुवारी रोजी शिवणी यात्रेत वाद झाला होता. त्यावरून पोलीस पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता इस्लापुर पोलिसात बोलवून घेतले. जुना राग मनात धरून या कार्यकर्त्यांना चोप दिला. दरम्यान, ज्या गावातून ही गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात होती. त्या गावातील गावक-यांसमक्ष या कार्यकर्त्यांना गुरा ढोराप्रमाणे मारहाण केली होती. त्याच दिवशी कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले होते. तर या घटनेविषयी आठ फेब्रुवारी रोजी सदर सहायक पोलीस निरिक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या विषयी अतिरीक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यात आली होती. ज्यात पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. या उलट विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनाच नोटिसा पाठवण्यात आली होती. दरम्यान, याविषयी विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निवेदनाव्दारे दिली तक्रार: दम्यान, याबाबत विश्व हिंदु परिषदेच्या वतीने पोलीस महासंचालक, मानवाधिकार आयोग, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अतिरीक्त पोलीस अधीक्षक भोकर या सर्वांकडे निवेदनाव्दारे तक्रार दिली आहे. निवेदनावर किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत, शशिकांत पाटील, विहीप जिल्हा मंत्री, श्रीराज चक्रावार, विहीप महानगर मंत्री,गणेश कोकुलवार, विहीप महानगर मंत्री, गणेश यशवंतकर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक, मनोज मामीडवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
उपविभागीय अधिकरी करणार चौकशी: पोलीस स्टेशनमध्ये अर्धनग्न करून युवकांना मारहाण करण्यात येत असल्याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदरचा व्हिडीओमध्ये सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे या विद्यार्थ्यांना मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर घटनेबाबत सत्यता पडताळणेसाठी तात्काळ कंधार उप विभागीय पोलीस अधिकारी थोरात यांचेकडे सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी देण्यात आले. यामध्ये सखोल चौकशी करून काही तथ्य आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.
हेही वाचा: sugarcane fire News शॉर्टसर्किटमुळे जळाला ऊस आगीत शेतकऱ्यांचे नऊ लाख रुपयांचे नुकसान