नांदेड - आजवर एकही कोरोना रुग्ण नसलेल्या नांदेड शहरात नुकताच एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा प्रचंड खबरदारी घेत असणतानाही काही लोक मात्र विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत.
आता या बिनकामी फिरणाऱ्यांना पोलीस विभाग धडा शिकवण्यासाठी चक्क यमदेवाला घेऊन आले आहेत. शहरातील वजिराबाद चौकात यमदेव आणि चित्रगुप्त उभे असून जो व्यक्ती बिनकामी फिरताना आढळून आला त्याची विचारपूस करत आहेत. या पुढे बिनकामी फिरणार नाही अशी ग्वाही त्या व्यक्तीकडून घेतली जाते
त्यानंतर यमदेव आणि चित्रगुप्त त्या व्यक्तीसोबत सेल्फी घेतात आणि मग त्याला जाऊ दिले जात आहे. पोलिसांच्या या नव्या युक्तीमुळे काही प्रमाणात रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.