ETV Bharat / state

गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पोलीस कोठडी

निक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना या प्रकरणातील दोन फरार आरोपी पंजाबात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांचे एक पथक पंजाबात पाठविण्यात आले. या पथकाने पंजाबात असलेल्या दोन आरोपींना पंजाब पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन नांदेडला आणले.

nanded police  caught riddha gangs two gangstar from punjab
गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पोलीस कोठडी
author img

By

Published : Jun 12, 2022, 7:07 PM IST

नांदेड - तीन वर्षापूर्वी शहरातील बाफना टी पाँईंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणात दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुदस्सर नदीम यांनी पोलीस कोठडी सुनावली. राजबीर नागरा आणि धर्मप्रित साहोता अशी आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी पंजाब येथून ताब्यात घेतले.

रिंधाच्या साथीदारांचा गोळीबार - तीन वर्षापूर्वी ९ फेब्रुवारी २०१९ ला सायंकाळी बाफना टी पाँईंटवर इंदरपालसिंघ भाटिया यांच्यावर गोळीबार झाला होता. कुख्यात गुंड हरविंदरसिंघ उर्फ रिंधा याच्याकडून भाटिया यांना खंडणी मागण्यात आली होती. खंडणी प्रकरणातच त्यांच्यावर रिंधाच्या साथीदारांनी गोळीबार केला. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

दोन फरार आरोपी पंजाबमध्ये - इतर दोन आरोपींचा शोध सुरु होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना या प्रकरणातील दोन फरार आरोपी पंजाबात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांचे एक पथक पंजाबात पाठविण्यात आले. या पथकाने पंजाबात असलेल्या दोन आरोपींना पंजाब पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन नांदेडला आणले. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. या प्रकरणात अजून तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी काहीही अधिक माहिती देण्यास नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.