नांदेड Nanded Crime News : कंधार येथील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी (Demanding Extortion) वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या फोन प्रकरणाचा तपास करत असताना, नांदेड पोलिसांना (Nanded Police) सिमबॉक्स कार्यप्रणालीद्वारे समांतर टेलीकॉम एक्सचेंज चालवून अनधिकृतपणे व्हीओआयपी कॉल करणारी, आंतरराज्यीय टोळी हाती लागली आहे. या टोळीकडून १० सिमबॉक्स आणि तब्बल १ हजार २४४ सीम कार्ड, लॅपटॉपसह आदी साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
'असे' फुटले आंतरराज्यीय टोळीचे बिंग : कंधार शहरातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळ्या क्रमांकावरुन खंडणीसाठी फोन येत होते. या व्यापाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी या क्रमांकाचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मिनिटा मिनिटाला या मोबाईल क्रमांकाचं लोकेशन एकमेकांपासून शेकडो कि.मी. अंतरावर दाखवत होते. त्यामुळे कॉलसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर पोलिसांना एक लिंक मिळाली. त्यावरुन हे पथक कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, बिहार या राज्यात गेल्याचे समजलं. परंतु हाती काही लागत नव्हतं. त्यातच केरळमध्ये एक व्यक्ती सिम कार्ड रिचार्ज करीत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हा दुबईला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी इमिग्रेशन कार्यालयाशी संपर्क साधून त्या आरोपीच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली. त्यानंतर शारजा येथून विमानतळावर आल्यावर लगेच त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर या सर्व आंतरराज्यीय टोळीचे बिंग फुटले.
कंधार शहरातील एका व्यापाऱ्याला वेगवेगळ्या क्रमांकावरुन खंडणीसाठी फोन येत होते. खंडणीसाठी येणारे सर्व क्रमांक ट्रेसिंगवर टाकण्यात आले. परंतु त्यातील एक मोबाईल क्रमांक क्षणात बेंगलोर तर दुसऱ्या क्षणी बिहारमध्ये दाखवत होता. कॉल करण्यासाठी आरोपी अत्याधुनिक यंत्रणा वापरत होता. - अबिनाश कुमार,अप्पर पोलिस अधीक्षक
तिघांना केली अटक : कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड वापरुन आंतरराष्ट्रीय कॉल, ॲप, सॉफ्टवेअरद्वारे व्हीओआयपीचे सिम जीएसएममध्ये रुपांतरीत करुन हे आरोपी खंडणीसाठी अनेकांना फोन करत होते. त्यासाठीच त्यांनी मोठ्या प्रमाणात सिम गोळा केले होते. नांदेड पोलीस तब्बल तीन महिने या प्रकरणाच्या तपासात होते. अखेर पोलिसांनी सियाबुद्दीन अब्दुल रहेमान, जयेश अशोक बेटकर (रा. दांडेली कर्नाटक) आणि राशिद अब्दुल अजीज (रा. कटाडी, केरळ) या तिघांना अटक केली आहे. अत्यंत गुंतागुंतीचा आणि किचकट तपास पोलिसांनी केला. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, मारोती थोरात, पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, चंद्रकांत पवार यांचा सहभाग होता.
हेही वाचा -