नांदेड - 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' पुस्तकामुळे महाराष्ट्रात वादंग निर्माण झाल आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुस्तकाचे लेखक व भाजपचे कार्यकर्ते जयभगवान गोयल यांचा निषेध केला जात आहे. नांदेडमधूनही लोकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा - निर्भया प्रकरणातील आरोपी मुकेश सिंगने दाखल केला दयेचा अर्ज..
देशभरात उमटलेल्या तीव्र पडसादानंतर जयभगवान गोयल यांनी वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराजांची कुणाशीच तुलना होऊ शकत नसून, आता या वादावर पडदा टाकावा असे म्हटले होते.
हेही वाचा - महागाईचा दर 5 टक्क्यापेक्षा जास्त वाढणे हे धोक्याचे - अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी