ETV Bharat / state

बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज हत्याप्रकरण : आरोपी पोलिसांच्या ताब्यात - पशुपतीनाथ महाराज हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. साईनाथ लिंगाडे हा महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेचा पंचनामा करत असताना मठातील बाथरूममध्ये अजून एक मृतदेह सापडला.

nanded nirwan rudra pashupatinath maharaj murder case accused arrested by police
बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज हत्याप्रकरण: आरोपी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : May 24, 2020, 4:09 PM IST

नांदेड - बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तेलंगणातील तानुर येथून ताब्यात घेतले आहे. साईनाथ लिंगाडे असे या आरोपीचे नाव आहे.

उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. साईनाथ लिंगाडे हा महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली आहे. या घटनेचा पंचनामा करत असताना मठातील बाथरूममध्ये अजून एक मृतदेह सापडला. हा मृतदेह नागठाना गावापासून जवळच असलेल्या चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपस्वी महाराजांसह भगवान शिंदे या दोघांची हत्या गावातीलच साईनाथ लिंगाडे या माथेफिरूने केल्याचे संशय होता. गावकऱ्यांनी त्याच्याविरुद्ध उमरी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. साईनाथ लिंगाडे एका खून प्रकरणातून जामिनावर सुटून आलेला आरोपी आहे. हा माथेफिरू गेल्या अनेक दिवसांपासून गावभर हातात कुऱ्हाड घेऊन गावातील लोकांना जीवे मारण्याची धमकी देत फिरत होता. याप्रकरणी गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि इतर गावकऱ्यांनी उमरी पोलीस ठाण्यात आरोपी साईनाथ लिंगाडे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीनंतर उमरी पोलिसांनी आरोपी साईनाथ लिंगाडे याला पोलीस ठाण्यात आणून समज देऊन एका तासात सोडून दिल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.

दरम्यान, काही वेळापूर्वी आरोपी आरोपी साईनाथ लिंगाडे या आरोपीस तेलंगणातील तानुर या गावातून तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीला उमरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.