नांदेड - महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाअभावी महानगरपालिकेच्या पाणीपट्टी वसूलीसाठी यंत्रणा कमी पडत आहे. पाटबंधारे विभागाची महानगरपालिकेकडे केवळ दोन कोटींची थकबाकी असल्याची माहिती आहे. पण महानगरपालिकेची थकबाकी मात्र 105 कोटींच्यावर आहे. तरीही वसुलीची यंत्रणा कमी पडत आहे. येणे जास्त...देणे कमी अशी, आगळी-वेगळी स्थिती दिसत आहे.
विशेष: नांदेड महानगरपालिकेचे ढिसाळ नियोजन, पाणीपट्टी वसुलीत दिरंगाई - nanded breaking news
महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाअभावी महानगरपालिकेच्या पाणीपट्टी वसूलीसाठी यंत्रणा कमी पडत आहे.
नांदेड महानगरपालिका
नांदेड - महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाअभावी महानगरपालिकेच्या पाणीपट्टी वसूलीसाठी यंत्रणा कमी पडत आहे. पाटबंधारे विभागाची महानगरपालिकेकडे केवळ दोन कोटींची थकबाकी असल्याची माहिती आहे. पण महानगरपालिकेची थकबाकी मात्र 105 कोटींच्यावर आहे. तरीही वसुलीची यंत्रणा कमी पडत आहे. येणे जास्त...देणे कमी अशी, आगळी-वेगळी स्थिती दिसत आहे.
नांदेड शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी नळसंख्या 58 हजार इतकी आहे. तर आता पर्यंतची थकबाकी 48 कोटी 96 लाख रुपये आहे. चालू वर्षाची नळपट्टी 15 कोटी 82 लाख रुपये आहे. एकूण शास्ती 40 कोटी 38 लाख रुपये आहे. एकूण थकबाकी 105 कोटी 17 लाख रुपये आहे.
आतापर्यंत झालेली वसूली-
त्यापैकी आजपर्यंतची वसूली थकबाकीतील 1 कोटी 66 लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षातील 1 कोटी 63 लाख आणि शास्ती वसुली 27 हजार रुपये आहे. एकूण वसुली तीन कोटी 30 लाख रुपये इतकी वसुली झाली आहे.
पाणी पट्टी भरण्यात आखडता हात-
महानगरपालिकेची विविध शासकीय विभागाकडे, एजन्सी आणि इतर संस्थांकडे पाण्याची थकबाकी आहे. त्यात केंद्रीय आणि राज्य सरकारची विभाग रेल्वे, परिवहन कॉर्पोरेशन आणि इतर सारख्या एजन्सी वॉटर बोर्ड आणि महानगरपालिकांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण पाणी पट्टी भरताना हात आखडता घेतला जातो. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेची थकबाकी वाढण्यात होतो. यावर मात्र अद्यापतरी महानगरपालिकेकडून कुठलीही उपाययोजना नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष्य देण्याची गरज आहे.
पाणी पट्टीत महापालिकेचा हात आखडता-
नांदेड शहराला इसापूर धरण आणि विष्णुपुरी धरणातून पाणीपुरवठा होतो. मराठवाड्यात जेव्हा दुष्काळाची परिस्थिती उद्भवली तेव्हा या धरणांनी नांदेडकरांना तारले. तरीही पाणीपट्टी भरण्यात मात्र महापालिका नेहमीच हात आखडता घेते ही शोकांतिका आहे.