ETV Bharat / state

'नियोजन समितीचा २० टक्के निधी कोरोनासाठी राखीव; वैद्यकीय सुविधा बळकट करण्यास  देणार प्राधान्य'

author img

By

Published : Apr 10, 2020, 9:41 AM IST

नांदेड जिल्हा नियोजन समितीतील २० टक्के रक्कम कोरोना उपाययोजनेतील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

Nanded Guardian Minister Ashok Chavan
नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड - जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दूर असलेल्या मुखेड, देगलूर व किनवट तालुक्याच्या शासकीय रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आमदारांच्या शिफारशीनुसार त्यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका, व्हेंटीलेटर, मास्क, पीपीई कीट अशा खबरदारीच्या साधनांची खरेदी करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या निजी कक्षात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा आणी वैद्यकीय साधनांची उपलब्धता तसेच मदतकार्याचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, आमदार बालाजी कल्याणकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके उपस्थित होते. या बैठकीबाबत माहिती देताना पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मागणीप्रमाणे नियोजन समिती व शासनामार्फत निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हेही वाचा.. देशभरात कोरोनाचे 5 हजार 734 रुग्ण, तर 166 जणांचा मृत्यू

जिल्हा मुख्यालयापासून दूरच्या तालुक्यातील लोकांना डायलिसिससाठी नांदेडला येणे शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन किनवट, देगलूर, मुखेड या तालुक्याच्या मुख्यालयी असलेल्या शासकीय रुग्णालयातच डायलिसीस मशिन उपलब्ध केली जाणार आहे. शक्य झाल्यास तेथे जास्तीच्या पदांना मंजुरी दिली जाईल किंवा खाजगीकरणाच्या माध्यमातून डायलिसीस मशिन हाताळण्यासाठी सोयीसुविधा उपलब्धतेसाठी निधी दिला जाईल. देगलूरला उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे, तेथे ५० खाटांची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.