नांदेड Nanded Crime : शहरातील एका तरुणाकडं अवैध 12 तलवारी आणि 11 खंजर आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नगीनाघाट परिसरातील दुकानातून 12 तलवारी आणि 11 खंजर जप्त केले आहेत. पोलिसांनी परमजित सिंग महेंद्र सिंग या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा प्रकारची शस्त्रं जप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
12 तलवारी आणि 11 खंजर जप्त : शहरातील तरुणांजवळ तलवार, खंजर आणि देशी पिस्तूल आढळत आहेत. गुन्ह्यांमध्ये या शस्त्रांचा वापर सर्रासपणानं करण्यात येत आहे. पोलिसांकडून ही शस्त्रं जप्त करण्यात येत असली तरी, त्यावर पूर्णपणे नियंत्रण मात्र मिळविता आलं नाही. गुरुवारी नगीनाघाट भागात एका जनरल स्टोअर्सवर स्थानिक गुन्हे शाखेनं छापेमारी केली. या दुकानातूनच तलवारी आणि खंजरची अवैधपणे विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी 12 तलवारी आणि 11 खंजर जप्त केले आहेत. शहरात अनेक ठिकाणी दुकानातून तलवारी आणि खंजरची विक्री करण्यात येते. तर काही भागातील घरांमध्ये तलवारी आणि खंजर तयार करण्याचे कारखानेच थाटण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा : कारखान्यावर छापा मारला होता. त्यात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा प्रकारची शस्त्रे जप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली खबऱ्याकडून माहिती काढून गुरुवारी नगीनाघाट भागातील जनरल स्टोअर्सवर छापा मारण्यात आला. या ठिकाणाहून 12 तलवारी आणि 11 खंजर जप्त करण्यात आले. आरोपी परमजित सिंग महेंद्रसिंग रामगडीया रा. नंदीग्राम सोसायटी यानं अवैधपणे ही शस्त्रे विक्रीसाठी ठेवली होती. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलं आहे.
हेही वाचा :