ETV Bharat / state

Nanded Crime News : परभणीतील बालकाची नांदेडमध्ये हत्या; दोरीने हातपाय बांधून फेकले तलावात - परभणी पोलीस

Nanded Crime News: नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणी न दिल्याने परभणी जिल्ह्यातील एका १४ वर्षीय बालकाचं अपहरण करुन त्याची नांदेडमध्ये हत्या (Murder in Nanded) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलंय.

Nanded Crime News
बालकाची नांदेडमध्ये हत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 2:54 PM IST

नांदेड Nanded Crime News : जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह (Dead Body of 14 Years Old Child) आढळून आला आहे. (Nanded Crime ) यावेळी दोरीने बालकाचे हात पाय बांधलेले होते. तसंच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असं या बालकाचं नाव आहे.

आरोपींनी बालकाचं अपहरण : मृत परमेश्वर बोबडे हा बालक परभणी शहरातील कृषीसारथी येथील रहिवासी आहे. तो गुरुकुल निवासी शाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. (Nanded News) ७ सप्टेंबरला पेपर देऊन तो गुरुकुलकडे जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याचं अपहरण केलं. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली होती.

आरोपींनी गुन्हा केला कबूल : दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं असता, त्या आरोपींनी गुन्हा केल्याची कबूल दिली. मुलाचा मृतदेह लोहा तालुक्यातील माळाकोळी जवळील माळेगावच्या तलावात हात पाय बांधून फेकल्याचं त्यांनी सांगितलं. माहिती आधारे परभणीच्या नवीन मोंढा पोलीस ठाण्याचे (Mondha Police Station ) सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, पोलीस अंमलदार नागनाथ मुंडे आणि पंकज उगले हे नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

खंडणीसाठी केले अपहरण : आरोपींनी ५० लाख रुपयाची खंडणी मागितली अशी प्राथमिक माहिती आहे. खंडणी न दिल्यानेच त्या निरागस बालकाची एवढ्या क्रूरतेने हत्या केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याप्रकरणाचा अधिक तपास परभणी पोलीस (Parbhani Police) करत आहेत. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. तर मागील काही दिवसांपासून नांदेडमध्ये अपहरणाची प्रकरणं मोठ्या प्रमाणात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपीना अटक करुण बालकाची सुटका केली होती.

हेहेी वाचा -

  1. Pune Crime News : भिशीच्या वादातून झाली 'त्या' गुन्हेगाराची हत्या; दोन तासात आरोपींना अटक
  2. Murder in Thane : ठाण्यात गँगवॉर? प्रतिस्पर्धी टोळीकडून अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून खून
  3. Amravati Crime News : काकाने चिमुकल्या पुतण्याला पायाखाली तुडवले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.