नांदेड - जिल्ह्यातील मुखेडचे भाजप आमदार तुषार राठोड यांचा शस्त्र परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केला. राठोड यांचे पिस्तुल चोरीला गेले होते. मात्र, त्यांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. पोलिसांना त्यांचे पिस्तुल एका चोरट्याकडे आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा - प्रथा परंपरा मोडण्याचा पायंडा भाजपनेच पाडला - नवाब मलिक
पिस्तुल बाळगताना निष्काळजीपणा दाखवल्याने राठोड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी धाब्यावर गोंधळ घालणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे राठोड यांचे पिस्तुल आढळून आले. या युवकाने हे पिस्तुल राठोड यांच्या घरून चोरल्याचे कबुलही केले होते. त्यानंतर पोलिसांनी आमदार राठोड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना त्यांचे पिस्तुल घरात सापडले नाही.
हेही वाचा - 'देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वत्र मंदी, केवळ भाजपच्या वाणीतच तेजी'
त्यामुळे या प्रकरणात नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी रीतसर नोटीस राठोड यांनी बजावली होती. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर त्यांचा शस्त्र परवाना निलंबित करण्यात आला. दरम्यान, चोरट्याने आमदारांच्या या पिस्तुलीचा धाक दाखवून गुन्हे केलेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. चोरट्याने जर काही गंभीर गुन्हे केले असतील तर आमदार देखील अडचणीत येऊ शकतात, अशी चर्चा सध्या पोलीस वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा - रिचार्ज महाग! मोबाईल कॉलिंगसह डाटाच्या दरात जिओकडून ४० टक्क्यांपर्यंत वाढ