ETV Bharat / state

नांदेड: जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

author img

By

Published : Mar 24, 2021, 10:04 PM IST

जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

डॉ. विपीन इटनकर
डॉ. विपीन इटनकर

नांदेड - जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात आहे. नागरिकांनीही जबाबदारीने वागून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. जिल्ह्यात लागू केलेल्या संचारबंदीचे काटेकोर पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. हा लढा सर्वांचा आहे, सर्वांनी कोरोना नियमांचे पालन केले तर आपण या संकटावर निश्चित मात करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात आज 1 हजार 165 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज जिल्ह्यात कोरोना निदासाठी एकूण 4 हजार 924 चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी 1 हजार 165 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 35 हजार 502 वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 674 जणांचा मृत्यू

सोमवार 22 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 70 वर्षांच्या एका महिलेचा, हदगाव येथील 64 वर्षांच्या एका पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवार 23 मार्च रोजी मुखेड तालुक्यातील चावणवाडी येथील 60 वर्षांच्या पुरुषाचा, साईबाबा मंदिर रोड नांदेड येथील 75 वर्षांच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर बुधवार 24 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील 45 वर्षांच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, माहूर येथील 71 वर्षांच्या एका पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 674 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती

एकूण घेतलेले स्वॅब - 2 लाख 85 हजार 53
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 43 हजार 649
एकूण पॉझिटिव्ह व्यक्ती- 35 हजार 502

आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या - 26 हजार 779

एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या - 674
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75. 42 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 68
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 410
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 816
प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्ती - 62

जिल्ह्यातील संपर्क अधिकारी

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.