ETV Bharat / state

Liquor Ban : दारूबंदीसाठी महिलां रस्त्यावर; लढ्यासाठी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात

author img

By

Published : Jan 11, 2023, 10:33 PM IST

तेलंगणाच्या सीमेवरील धर्माबाद तालुक्यातील नायगावातील दारूचे दुकान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बंद करण्यात आले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी दिलेल्या आदेशाने दुकान पुन्हा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नायगावातील महिला संतप्त झाल्या असून दारूची दुकाने बंद करण्यासाठी महिला पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत.

Liquor Ban
दारूबंदीसाठी महिलां रस्त्यावर
दारूबंदीसाठी महिलां रस्त्यावर

नांदेड - चौथी, पाचवीची मुलंही १०-१० रूपये जमवून मद्यपान करत असल्याने नायगाव (ध.) हे गाव राज्यात चर्चेला आले होते. नांदेड जिल्हयातल्या धर्माबादपासून ११ किमीवर जवळपास १ हजार ५०० लोकवस्तीचे नायगाव (ध.) आहे. गावापासून दीड किमीवर तेलंगणा राज्य आहे. ग्रामदैवत महलक्ष्मी मंदिराच्या समोरच देशी दारूच्या दुकानामुळे गावामील महिलांचे जगणे कठीण झाले आहे.

दुकानामुळे कुटुंबांची राखरांगोळी - स्वस्तात दारू मिळते म्हणून तेलंगणातील ग्रामस्थ चोरट्या मार्गाने दारू पिण्यासाठी इथे येतात. दारूच्या दुकानामुळे अनेक कुटुंबांची राखरांगोळी झाली आहे. दारूच्या व्यवनापायी अनेकांनी पती, जवाई, मुले गमावली आहेत. गावातील महिलांनी दारू दुकान बंद करण्यासाठी चार वर्ष लढा दिला होता. तत्कालीन ज‍िल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या आदेशनंतर ५ मार्च २०२१ रोजी महिलांनी ग्रामसभेत दारू बंदीसाठी ठराव घेतला होता.

विद्यार्थ्यांवर होणार परिणाम - गावातील तंटे, घरगुती हिंसाचारात होणारी वाढ या सर्व गोष्‍टी दारूमुळे होत असल्याने गावातील दारूचे दुकान बंद करण्याचा निणर्य महिलांनी घेतला आहे. बिलोली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जुलै २०२१ मध्ये दारू दुकानाला सील ठोकले होते. यावेळी गावातील महिला, पुरूषांनी एकजुटीचा विजयोत्सव साजरा केला होतो. परंतू, या लढ्याला दीड वर्ष पूर्ण होत नाही तोच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या फेर आदेशाने मागील २० दिवसांपासून दारूचे दुकान सुरू झाले आहे.

न्यायालयात देणार लढा - दारू दुकान कायमचे बंद करण्यासाठी महिलांनी पुन्हा एकजुटीने न्यायालयात लढा उभरण्यासाठी ७ जानेवारपासून लोकवर्गणीला सुरवात केली आहे. यात पहिल्या दिवशी नायगांव (ध.) , बेल्लूर, जाफलापूर, चिंचोली, दुसऱ्या दिवशी बासर तर, तिसऱ्या दिवशी सोमवारी धर्माबाद तालुक्यात लोकवर्गणी जाम करण्यास सुरूवात केली आहे.

दारुबंदीसाठी आंदोलन - नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील नायगांव (ध.) या गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आता लोकवर्गणी जमा करायला सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बंद झालेले दारूचे दुकान राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांच्या फेर आदेशाने सुरू झाले. त्यामुळे गावातील दारूचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी गावातील महिलांनी दीर्घकाळ लढा देण्याचे निश्चित केला आहे. त्यासाठी नायगांव (ध.) इथल्या महिला आजूबाजूच्या गावात जाऊन जनजागृती करत लोकवर्गणी गोळा करतात. महिलांच्या या आंदोलनात आंदोलनात शेवटपर्यंत सहभागी होणार आहे.

नायगांव (ध.) येथे बंद झालेले दुकान चालु झाले आहे. त्यामुळे गावात पुन्हा त्रास सुरू झाला आहे. प्रत्येकाच्या घरी भांडण तंटे होत आहेत. स्थानिक लोप्रतिनिधींचा याला पाठिंबा आहे. न्यायालयात लढा देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. तरी आम्ही भिक मागून लोकवर्गणी गोळा करत आहोत अशी, प्रतिक्रिया शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आकाश रेड्डी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.