ETV Bharat / state

पैश्याच्या कारणावरून एकाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - murder of truck driver nanded news

फायनान्सचे पैसे देणे घेण्याच्या कारणावरुन ट्रक चालक व सदरील आरोपींची बाचाबाची सुरू होती. त्यावेळी ट्रक मालकांनी तोपर्यंत दहा हजार रुपये घ्या नंतर बघूत असा पर्याय सूचवला. मात्र, आरोपींनी काही न ऐकता अब्दुलला जबरदस्ती कारमध्ये बसवून घेऊन गेले.

पैश्याच्या कारणावरून एकाचा खून
पैश्याच्या कारणावरून एकाचा खून
author img

By

Published : May 22, 2021, 12:36 PM IST

नांदेड- बामणी शिवारात पैशाच्या कारणावरून एका ट्रकचालकाचा खून झाल्याची घटना घडली. अब्दुल जब्बार मोहम्मद नजीर (वय ३५) रा. महबूबनगर, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबरदस्तीने कारमध्ये नेले उचलून

अब्दुल दि .२० गुरूवार रोजी धनेगाव येथील माजिद मोटार गॅरेज येथे ट्रक क्र . ( एम.एच.२६ बी.ई .८७८६ ) या ट्रकची दुरूस्ती करत होता. तेव्हा फायनान्सचे पैसे देणे घेण्याच्या कारणावरुन ट्रक चालक व सदरील आरोपींची बाचाबाची सुरू होती. त्यावेळी ट्रक मालकांनी तोपर्यंत दहा हजार रुपये घ्या नंतर बघूत असा पर्याय सूचवला. मात्र, आरोपींनी काही न ऐकता अब्दुलला जबरदस्ती कारमध्ये बसवून घेऊन गेले.

मारहाण करून मृतदेह फेकून दिला.
अब्दुलला बामणी शिवारात आणून लाकडाने व बेल्टने मारहाण केली त्यानंतर त्याला जीवे मारले. हत्येनंतर अब्दुलचा मृतदेह जांभरून शिवारात फेकून दिला. हत्येनंतर अब्दुलचा भाऊ मोहम्मद जावेद मोहम्मद नजीर यांच्या फिर्यादीवरून शेख अब्दुल शेख लतीफ राहणार वाघी रोड, जेबा फंक्शन हॉल जवळ नांदेड , मोंटीसिंघ (खालसा फायनान्स वाला) नांदेड, मजहरखान नाविदखान रा. खडकपूरा नांदेड, वसीम भाई, सुशांत या पाच जणांविरुद्ध कलम ३०२,३६४,१४७,१४८,१४ ९ भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.