ETV Bharat / state

भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर बंद व मोर्चा..

जिल्ह्यातील मुदखेडचे भाजप शहराध्यक्ष मुन्ना चांडक आणि ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक गोविंद गोपनपले या दोन पदाधिकाऱ्यांवर अ‌ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे राजकीय हेतूतून दाखल करण्यात आले असून हे खोटे आहेत, असा आरोप व निषेध करत भाजपतर्फे मुदखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

author img

By

Published : Feb 4, 2021, 1:55 PM IST

भाजप मुदखेड शहर बंद व मोर्चा
भाजप मुदखेड शहर बंद व मोर्चा

नांदेड - जिल्ह्यातील मुदखेडचे भाजप शहराध्यक्ष मुन्ना चांडक आणि ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक गोविंद गोपनपले या दोन पदाधिकाऱ्यांवर अ‌ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे राजकीय हेतूतून दाखल करण्यात आले असून हे खोटे आहेत, असा आरोप व निषेध करत भाजपतर्फे मुदखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच, तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हे मागे घेण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुदखेड शहर बंद व मोर्चा..
यापूर्वी मुदखेड नगरपालिकेसमोर केले होते 'कचरा फेको आंदोलन'

मुदखेड नगरपालिकेतर्फे चिकन मार्केटमधील कचरा दिवसा उचलण्यात येतो. चिकन मार्केटमधील कचरा दिवसा नेत असताना याचा त्रास येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तसेच, दुकानदारांना होत होता. हा कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष मुन्ना चांडक यांनी एका निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल पालिका प्रशासन किंवा संबंधित ठेकेदारांनी घेतली नाही. त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिकन मार्केटमधील कचरा पालिका कार्यालयाच्या मुख्य दारावर टाकून आंदोलन केले होते.

हेही वाचा - नांदेड विभागातून 33 किसान रेल्वे धावल्या; मालवाहतूकीतून साडेसहा कोटींचे उत्पन्न

आंदोलनाचा राग मनात धरून गुन्हा दाखल केल्याचा आरोप

या प्रकरणात कचरा ठेकेदारांनी भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी मुदखेड बंद ठेवून काळे पट्टे लावून मुदखेड शहरातील सुभाषगंज मोंढा येथून थेट तहसील कार्यालयावर मोर्चा काढून गुन्हे दाखल केलेले परत घ्या अशी मागणी भाजपा पदाधिकारी यांनी केली.

यापूर्वीसुद्धा दाखल केला होता खंडणीचा गुन्हा

मुदखेडच्या सत्ताधाऱ्यांनी यापूर्वीसुद्धा न्याहळी येथे सीसी रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत होते. ते काम माजी नगरसेवक गोविंद गोपनपले व शहरध्यक्ष मुन्ना चांडक यांनी बंद केल्या प्रकरणात संबंधित ठेकेदारांनी भाजपच्या याच दोन कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारांनी याच दोन पदाधिकाऱ्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे परत घ्या, अशी मागणी यावेळी जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष अ‌ॅड. किशोर देशमुख व भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख यांनी केली. तसेच, भाजप कार्यकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे मागे न घेतल्यास जिल्हाभर भाजप आंदोलन करेल, असा इशारा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर देशमुख यांनी दिला.

शहरात चोख पोलीस बंदोबस्त

मुदखेड मध्ये सत्ताधारी काँग्रेसविरुद्ध भाजप असे शीतयुद्ध रंगले असून त्याला चांगलाच रंग भरला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

मुदखेड तहसीलदार यांना निवेदन

यावेळी अ‌ॅड.किशोर देशमुख, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष देवा पाटील धबडगे, तालुका उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रवीण काचावार, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रकाश बल्फेवाड, आनंदराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव शिंदे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी मुदखेडचे तहसीलदार व मुदखेड पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना दिले.

हेही वाचा - नांदेड: मुख्यमंत्री सडक योजनेतील निकृष्ट दर्जाचे काम गावकऱ्यांनी पाडले बंद

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.