हरियाणा : विधानसभेचे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार, हरियाणात भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. भाजपा पुन्हा सत्तेत येईल की काँग्रेस कमबॅक करेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. फायनल निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात भाजपाला 48, काँग्रेसला 37 तर इतरांना 5 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं 45 हा बहुमताचा आकडा भाजपानं गाठला आहे.
दसऱ्याला होणार शपथविधी : हरियाणात भाजपानं बहुमत मिळवलं आहे. त्यामुळं राज्यातील भाजपा कार्यकर्ते आनंदात आहेत. निकालानंतर आता शपथविधी सोहळ्याच्या तारखेची चर्चा सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील नव्या सरकारचा शपथविधी दसऱ्याच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. दसऱ्याच्या दिवशी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं आहे.
हरियाणा का हृदय से आभार!
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2024
भारतीय जनता पार्टी को एक बार फिर स्पष्ट बहुमत देने के लिए मैं हरियाणा की जनशक्ति को नमन करता हूं। यह विकास और सुशासन की राजनीति की जीत है। मैं यहां के लोगों को विश्वास दिलाता हूं कि उनकी आकांक्षाओं को पूरा करने के लिए हम कोई कोर-कसर नहीं छोड़ेंगे।
हरियाणावासियांचे मनःपूर्वक आभार! : पंतप्रधान मोदी - "भाजपाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल मी हरियाणाच्या जनतेला सलाम करतो. विकास आणि सुशासनाच्या राजकारणाचा हा विजय आहे. मी येथील जनतेला खात्री देतो की, त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही," असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील जनतेला दिलं.
#WATCH | BJP workers celebrate party's performance in the Haryana Assembly elections, at party headquarters in Delhi. pic.twitter.com/T0YZl34DB1
— ANI (@ANI) October 8, 2024
मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांचं कौतुक केलं : "या महान विजयासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही राज्यातील जनतेची केवळ सेवाच केली नाही, तर आमचा विकासाचा अजेंडा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याचाच परिणाम म्हणून हरियाणात भाजपानं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे," असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांचं कौतुक केलं.
काँग्रेसला मोठा धक्का : 5 ऑक्टोबर रोजी हरियाणात विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. त्यानंतर मंगळवारी (8 ऑक्टोबर) या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मतदानानंतर हरियाणामध्ये निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले होते. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या बाजुनं कौल देण्यात आला होता. तसंच गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. मात्र, आता हे एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरले आहेत. राज्यात काँग्रेसला 37 जागा जिंकता आल्या आहेत.
हरियाणा के विधानसभा चुनाव में भारतीय जनता पार्टी की यह निरंतर विजय यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में डबल-इंजन सरकार द्वारा क्रियान्वित कल्याणकारी नीतियों पर जन-जन के अटूट विश्वास का प्रतिबिंब है।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) October 8, 2024
यह जनादेश दर्शाता है कि कांग्रेस की विभाजनकारी और तुष्टिकरण…
2047 पर्यंत भाजपाचं सरकार : भाजपा प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली म्हणाले की, "मी सर्व एक्झिट पोल एजन्सींचे आभार मानतो की त्यांनी काँग्रेसला 2 दिवस आनंद दिला. भाजपाची सत्ता 2047 पर्यंत कायम राहणार आहे. देशातील आणि राज्यातील जनता भाजपाच्या धोरणांवर आणि कृतींवर समाधानी आहे. जनता भाजपासोबत आहे. माझा हा विश्वास होता कारण मी माझ्या 20 हजारांहून अधिक बूथवरून प्रतिक्रिया घेतल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले, त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत."
'आरएसएस'चा पाठिंबा : लोकसभा निवडणुकीत राहिलेल्या उणिवा विधानसभा निवडणुकीत दूर करण्याचा यावेळी भाजपानं जोरदार प्रयत्न केला. यावेळी भाजपा आणि 'आरएसएस' खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, त्याचा परिणाम ग्राउंड लेव्हलवरील निवडणूक निकालांवरही दिसून आला. ही निवडणूक संघ म्हणून लढण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरल्याचं स्पष्ट झालं.
वीरभूमि हरियाणा की जनता को नमन।
— Amit Shah (@AmitShah) October 8, 2024
हरियाणा में भाजपा की यह प्रचंड जीत किसानों, गरीबों, पिछड़ों, जवानों और युवाओं का प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व वाली भाजपा सरकार में अटूट विश्वास की जीत है।
वीरभूमि की जनता ने जाति और क्षेत्र के आधार पर बाँटने वाली कांग्रेस की… pic.twitter.com/bnVTVTgbJF
पराभव झालेले चेहरे (सर्व पक्ष) : दुष्यंत चौटाला, ब्रिजेंद्र सिंग, अभय यादव, भव्य बिष्णोई, ज्ञानचंद गुप्ता, ओम प्रकाश धनखर, कॅप्टन अभिमन्यू, अभय चौटाला, सुभाष सुधा, संजय सिंग, असीम गोयल, देवेंद्र बबली, रणजित चौटाला, दिग्विजय चौटाला, अनिल विज, घनश्याम दास अरोरा, जगमोहन आनंद, प्रमोद विज, निखिल मदन, विनोद भयना.
हेही वाचा -