ETV Bharat / state

माहुरमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; तिघांना अटक

सध्या महावितरणच्यावतीने सर्वत्र वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम राबवली जात आहे. या दरम्यान माहूर तालुक्यातील मौजे मलकागुंडा तांडा येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली.

जखमी दिपक राठोड
जखमी दिपक राठोड
author img

By

Published : Jan 31, 2020, 1:22 PM IST

नांदेड - माहूर तालुक्यातील मौजे मलकागुंडा तांडा येथे वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. दिपक राठोड असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते महावितरणमध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ म्हणून काम करतात.

सध्या महावितरणच्यावतीने सर्वत्र वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम राबवली जात आहे. वरीष्ठ तंत्रज्ञ दिपक राठोड हे आपले सहकारी पवन कनाके यांच्यासह वीजबील वसुलीसाठी मलकागुंडा तांडा येथे गेले होते. नानू सवई राठोड हे आकडा टाकून वीज चोरी करत असल्याचे दिपक यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता, नानू राठोड याने वीज कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्याची मुले सुनिल नानू राठोड आणि पिंटू नानू राठोड यांनी तंत्रज्ञ दिपक राठोड यांना बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - ...तर घरगुती सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार

माहूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या नानू सवई राठोड, सुनिल नानू राठोड आणि पिंटू नानू राठोडच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तीन्ही आरोपींना अटक केली आहे.

Intro:महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण;मलकागुंडा तांडा येथील घटना; तीन आरोपींना अटकBody:महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण;मलकागुंडा तांडा येथील घटना; तीन आरोपींना अटक

नांदेड : माहूर तालूक्यातील मौजे मलकागुंडा तांडा येथे वीज बिल वसुली करता आपल्या सहकांऱ्यासह वरीष्ठ तंत्रज्ञ दिपक राठोड गेले असताना नानू सवई राठोड हे आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे दिसून आले. वीजचोरी करू नका असे सांगत असताना नानू राठोड यांच्या दोन मुलांनी दिपक राठोड यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

सध्या महावितरणच्या वतीने विज बिल वसुलीची जोरदार मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. मात्र या वसुली मोहिमेस गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरीष्ठ तंत्रज्ञ दिपक राठोड हे आपले सहकारी पवन कनाके यांच्यासह वीजबील वसुली करत मलकागुंडा तांडा येथे गेले असता नानू सवई राठोड आकडा टाकून वीज चोरून वापरत असल्याचे दिसुन याबाबत विचारणा केली असता, नानू राठोड याने तुझ्या बापाच्या घरची वीज कंपनी आहे का असे म्हणत शिवीगाळ केली तसेच त्याचा मुलगा सुनिल नानू राठोड व पिंटू नानू राठोड यांनी चापटा बुक्कयांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.
नानू राठोड याने तू वायर कशी काढतोस, तू गावात कशी नौकरी करतोस ते बघतो असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. झाल्या प्रकाराबाबत माहूर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या नानू सवई राठोड, सुनिल नानू राठोड व पिंटू नानू राठोड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.