ETV Bharat / state

नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची परिस्थिती लाज वाटावी अशी - खासदार चिखलीकर

नांदेड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याबद्दल खासदार चिखलीकर यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी येथील रुग्णालयातील उपलब्ध साधन-सामुग्रीचा आढावा त्यांनी घेतला.

mp prataprao chikhalikar on dr shankarrao chavan government medical hospital at nanded
नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची परिस्थिती लाज वाटावी अशी
author img

By

Published : Sep 13, 2020, 3:29 PM IST

नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती पाहून खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना धक्काच बसला. ही परिस्थिती पाहून खासदार म्हणून मला ही लाज वाटावी अशी परीस्थिती आहे. सगळा सावळा गोंधळ व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासन व राज्य सरकारवर सुद्धा टीका केली.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील तक्रारीसंदर्भात खासदार चिखलीकर यांनी अचानक रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संदर्भाने आढावा घेतला, तसेच उपलब्ध खाटा, आयसीयू बेड बद्दल माहिती घेतली. या रुग्णालयात कोटोनाच्या रुग्णांचे हाल होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की या रुग्णालयात पुरेसा अधिकारी व कर्मचारी वर्ग नाही. ओपीडीमध्ये कोरोनाचे लक्षणे असणारे रुग्ण उपचार घेत आहेत, ही दुर्देवाची बाब आहे. या रुग्णाची अत्यंत वाईट अवस्था आहे. सरकार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असल्याचे सांगत आहे. मात्र नांदेडमध्ये ओपीडीमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. जे बाधित नाहीत, अशांना कोरोना होण्याचा धोका असल्याचे चिखलीकर यांनी म्हटले.

या रुग्णालयातील घाण पाहता, ग्रामीण भागातील उकिंडा बरा म्हणण्याची वेळ आहे. इतकी घाण रूग्णालयात आहे. अशी घाण असल्यास रुग्णांचे आरोग्य कसे उंचावेल, असा प्रश्न चिखलीकर यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या अधिवेशनात या रुग्णालयाच्या प्रश्न मांडावा लागेल, असा इशारा चिखलीकर यांनी दिला.

नांदेड येथील दोनशे खाटाच्या रुग्णालयाचे उद्घाटन होऊन दोन महिने होऊन गेले. त्या रुग्णालयात आतापर्यंत चार जणांनी उपचार घेतले. यात जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. हे रुग्णालय उपयोगात का आणले जात नाही? मग उद्घाटन करण्याची घाई उद्धाटन करणाऱ्यांना का होती, अशी टीका चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.