नांदेड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता असून जनतेने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करावे. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून कुठलीही अडचण आल्यास मला संपर्क करावा. मी मरेपर्यंत जनतेच्या सेवेसाठीच कार्य करणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
संचारबंदीच्या काळात सरकारच्या धान्य वाटपावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी चांगले नियंत्रण ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यात गावोगावी जाऊन ते धान्य वाटप योजनेचा आढावा घेत आहेत. आज धर्माबादमध्ये जाऊन त्यांनी धान्य वाटप योजनेची माहिती घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
कोरोना संसर्गाच्या दहशतीत देखील खासदार चिखलीकर जिल्हाभर फिरुन आढावा घेत आहेत. आज धर्माबाद येथील गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. अन्नधान्यापासून जिल्ह्यात कुणीही वंचीत राहू नये, यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचेही चिखलीकर यांनी सांगितले आहे.