ETV Bharat / state

खोट्या कामांच्या भूमीपूजनाचे नारळ कधीच फोडणार नाही - खासदार चिखलीकर

खासदार चिखलीकर यांनी जिल्ह्यात 'खासदार आपल्या दारी' या अभियानाला प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात भोकर मतदारसंघातून केली. मुदखेड, भोकर आणि अर्धापूर या ठिकाणी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आढावा बैठक घेतली.

बैठकीत बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Jun 3, 2019, 2:04 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा असेल. नवीन कामे सुरू करण्याचा माझा आग्रह राहील. मात्र, जे काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करू शकेल. त्याच कामाचे भूमिपूजन करेल. खोट्या कामाचे कधीच भूमीपूजन करणार नाही, असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले. ते अर्धापूर येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलत होते.

बैठकीत बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर

खासदार चिखलीकर यांनी जिल्ह्यात 'खासदार आपल्या दारी' या अभियानाला प्रारंभ केला आहे. त्याची सुरुवात भोकर मतदारसंघातून केली. मुदखेड, भोकर आणि अर्धापूर या ठिकाणी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी तिन्ही तालुक्यातील विविध खातेप्रमुखांची पाणीटंचाई निवारणार्थ बैठक घेऊन त्यांना विविध प्रलंबित कामाच्या अनुषंगाने चांगलेच धारेवर धरले. यापुढे कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य देत प्रलंबित कामे जास्त दिवस ताटकळत ठेवू नयेत, असे ठणकावून सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारण करण्याच्या संदर्भाने प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देण्याचा माझा मानस आहे. विशेष म्हणजे भोकर मतदार संघ हा माझा मतदार संघ आहे. या मतदारसंघातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा असेल. तसेच मला वाटले 'दुरून डोंगर साजरा दिसतो' तसेच भोकर मतदारसंघाचेही दिसून आले. भोकर मतदारसंघात काहीच विकासकामे शिल्लक नसतील असे वाटले. मात्र, याठिकाणी आल्यानंतर कळले की अद्याप काहीच विकास झालेला नाही. मला भेटायचे असल्यास कुणाच्याही मध्यस्थाची गरज नाही. कुणीही सहज भेटू शकता. २४ तास आपल्यासाठी हा खासदार उपलब्ध असल्याचे चिखलीकर म्हणाले.

दरम्यान, भोकर मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात ठिकठिकाणी खासदार चिखलीकर यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राम चौधरी, प्रवीण गायकवाड यांच्यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:मी खोट्या कामाच्या भूमीपूजनाचे नारळ कदापीही फोडणार नाही- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड: माझा नांदेड जिल्ह्यातील विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी माझा आग्रह आहे. पण जे काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करू शकेल. त्याच कामाचे भूमिपूजन करेन. खोट्या कामाचे कदापिही भूमिपूजन करणार नाही असा अप्रत्यक्ष टोला खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना लगावला. ते अर्धापूर येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलत होते.
Body:मी खोट्या कामाच्या भूमीपूजनाचे नारळ कदापीही फोडणार नाही- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड: माझा नांदेड जिल्ह्यातील विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे. अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी माझा आग्रह आहे. पण जे काम मी प्रामाणिकपणे पूर्ण करू शकेल. त्याच कामाचे भूमिपूजन करेन. खोट्या कामाचे कदापिही भूमिपूजन करणार नाही असा अप्रत्यक्ष टोला खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना लगावला. ते अर्धापूर येथील पाणीटंचाई आढावा बैठकीत बोलत होते.

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यात 'खासदार आपल्या दारी' या अभियानाला प्रारंभ करत त्यांची सुरुवात भोकर मतदारसंघातून केली. मुदखेड, भोकर व अर्धापूर या ठिकाणी त्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई आढावा बैठक घेतली.
यावेळी तिन्ही तालुक्यातील विविध खातेप्रमुखांची पाणीटंचाई निवारणार्थ बैठक घेऊन त्यांना विविध प्रलंबित कामाच्या अनुषंगाने चांगलेच धारेवर धरले. अर्धापूर येथील बैठकीत खा. प्रताप पाटील चिखलीकर बोलताना म्हणाले की, यापुढे कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने जनतेच्या कामांना प्राधान्य देत प्रलंबित कामे जास्त दिवस ताटकळत ठेवू नयेत. असे ठणकावून सांगीतले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दुष्काळ व पाणीटंचाई निवारण करण्याच्या संदर्भाने प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. असे म्हणाले.
माझ्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देण्याचा माझा मानस आहे. खास करून भोकर मतदार संघ हा माझा मतदार संघ असून येथील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी माझा पाठपुरावा असेल. तसेच मला वाटले 'दुरून डोंगर साजरा दिसतो' तसेच भोकर मतदारसंघाचेही दिसून आले. भोकर मतदारसंघात काहीच विकासकामे शिल्लक नसतील असे वाटले पण इथे आल्यानंतर कळले की इथे अजून काहीच विकास झाला नाही. मला भेटायचे असल्यास कुणाच्याही मध्यस्थाची गरज नाही. कुणीही सहज भेटू शकता. असे म्हणत २४ तास आपल्यासाठी हा खासदार उपलब्ध असल्याचे सांगितले.
दरम्यान भोकर मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात ठिकठिकाणी खा.चिखलीकर यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, राम चौधरी, प्रवीण गायकवाड यांच्यासह भाजपा, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.