ETV Bharat / state

नांदेडात खासदार हेमंत पाटील यांनी केली सॅनिटाइझरची फवारणी

खासदार हेमंत पाटील स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी या भागाची साफसफाई करवून घेतली. त्यानंतर स्वतः फवारणी यंत्र हातात घेऊन त्यांनी या भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे.

MP Hemant patil
नांदेडात खासदार हेमंत पाटील यांनी केली सॅनिटाइझरची फवारणी
author img

By

Published : Apr 13, 2020, 8:48 AM IST

नांदेड - नांदेडमध्ये खासदार हेमंत पाटील यांनी सॅनिटायझरची फवारणी केली. नांदेड शहरातील तरोडा नाका भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असतो. त्यातच इथे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते.

खासदार हेमंत पाटील स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी या भागाची साफसफाई करवून घेतली. त्यानंतर स्वतः फवारणी यंत्र हातात घेऊन त्यांनी या भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी करायचे काम स्वतः खासदाराने केल्याने कौतुक करण्यात येत आहे, मात्र नांदेडमध्ये मनपा कोरोनाबाबत जागरूक नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, त्यामुळे नांदेडकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, प्रशासनाने योग्य खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यासाठी चिंतेची बातमी येऊ शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.