नांदेड : नांदेडचे-हिंगोली लोकसभेचे खासदार खासदार ( Hingoli LokSabha MP Hemant Patil ) हे शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्यावर शिवसैनिकांकडून टीका करण्यात आली. शिवसैनिकांचा रोष यामुळे त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. स्वतःच्या घराची सुरक्षा करण्यासाठी शिवसैनिक नेहमी समर्थ असतो, असे म्हणत हेमंत पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना ( Nanded Superintendent of Police ) पत्राद्वारे घराला दिलेली सुरक्षा काढून घेण्यास सांगितले आहे. जो अंगावर येईल त्यास शिंगावर घेऊ, असा सज्जड इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन : खासदार हेमंत पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नांदेड शहरातील त्यांच्या 'तुकाई' निवासस्थानी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. खासदार हेमंत पाटील यांनी गुरुवारी दि. २१ जुलै रोजी पोलीस प्रशासनाने पुरविलेल्या बंदोबस्ताबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानत 'तुकाई' निवासस्थानवरील पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा, असे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
विरोधकांना दिला सज्जड दम : अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या राजकीय जीवनामध्ये मी नेहमी सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. याच सर्वसामान्य जनतेच्या जोरावर नगरसेवक पदापासून ते भारताच्या सर्वोच्च सभागृहाचे मी खासदार म्हणून लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे माझा माझ्यापेक्षा जास्त येथील जनतेवर व कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यातूनही विरोधक म्हणून काही समाजकंटकांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिंगावर घेण्याकरिता मी सक्षम आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना ठणकावले आहे.
माजी खासदार सुभाष वानखेडे यांची टीका : सुभाष वानखेडे यांची सेनेत येताच बंडखोर खासदार हेमंत पाटीलवर टीका होती. रस्त्यावरचा टुक्कार पोराला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा केला आणि पार्लामेंटमध्ये पाठवले. हेमंत पाटील हा दारिद्र्यरेषेत राहत होता, आता 1000 कोटी रुपयांचा माणूस झाला ( Become a Man Worth Rs 1000 Crore ) कसा? असा प्रश्न हेमंत पाटील यांना केला. विनायक राऊतने पैसे मागितल्यावर तुम्ही तेव्हा का चूप होता. 12 वर्षे जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिणचे आमदार असताना तेव्हा का शांत बसले. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बंडखोर खासदार हे राऊत आणि सेनेवर टीका करीत आहेत. आता लोकांना तुम्ही हे पण सांगा की, आम्ही पैसे घेऊन बंडखोरी केली. आता पक्षांनी जबाबदारी दिली आहे, बंडखोराला हदगाव हिमायतनगर विधानसभेसह हिंगोली जिल्ह्यात आम्ही गावबंदी आणणार आहे.