ETV Bharat / state

अपघातातून बचावले खासदार चिखलीकर

खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या गाडीचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे.

खासदार प्रताप पाटील-चिखलीकर
author img

By

Published : Oct 28, 2019, 11:55 PM IST

नांदेड - खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या गाडीचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. नांदेडहून लोहाकडे आज (सोमवार) दुपारी चिखलीकर जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीच्या दिशेने एक भरधाव ट्रक आला. चिखलीकर यांच्या चालकांने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला उतरवली त्यामुळे अपघातातून बचाव झाला. अन्यथा भीषण अपघात घडला असता, यात केवळ दैव बलवत्तर म्हणून चिखलीकर सुखरूप बचावले आहेत.

वाडी पाटीजवळ लोह्याकडून येणारा एक भरधाव ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. हा ट्रक खासदार असलेल्या गाडीवर येऊन धडकणार होता, हे क्षणार्धात लक्षात घेऊन खासदाराच्या चालकाने आपली गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे खासदाराची गाडी थोडक्यात बचावली, अन्यथा मोठा अपघात घडला असता. हा क्षण असा होता की गाडीत असणाऱ्या खासदार चिखलीकर आणि माधव पावडे यांना बराच काळ काही सुचलेच नाही. आपण बचावल्या गेलो याचेच समाधान त्यांना होते.

दरम्यान, भरधाव आणि विरुद्ध दिशेने आलेल्या त्या ट्रकचा चालक नशेत असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी त्या ट्रक चालकासह ट्रकला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार नेमका ट्रक चालकाच्या नशेतून घडला की त्या मागे अन्य काही कट कारस्थान आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी चिखलीकर समर्थकांनी केली आहे.

Intro:नांदेड : खासदार चिखलीकर अपघातातून बचावले चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला.

नांदेड : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गाडीचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे. नांदेडहुन लोहा कडे आज दुपारी चिखलीकर जात होते त्यावेळी त्यांच्या गाडीच्या दिशेने एक भरधाव ट्रक आला. चिखलीकर यांच्या चालकांने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला उतरवली त्यामुळे अपघातातून बचाव झालाय. अन्यथा भीषण अपघात घडला असता, यात केवळ दैव बलवत्तर म्हणून चिखलीकर सुखरूप बचावले आहेत.Body:
खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आज दुपारी नांदेडहुन लोहा कडे जात होते. वाडी पाटीजवळ लोह्याकडून येणारा एक भरधाव ट्रक आपली साईड सोडून विरुद्ध दिशेने येत होता. हा ट्रक खासदार असलेल्या गाडीवर येऊन धडकणार होता, हे क्षणार्धात लक्षात घेऊन खासदाराच्या चालकाने आपली गाडी थेट रस्त्याच्या खाली उतरवली. त्यामुळे खासदाराची गाडी थोडक्यात बचावली, अन्यथा मोठा अपघात घडला असता. हा क्षण असा होता की गाडीत असणाऱ्या खासदार चिखलीकर आणि माधव पावडे यांना बराच काळ काही सुचलेच नाही. आपण बचावल्या गेलो याचेच समाधान त्यांना होते.Conclusion:दरम्यान भरधाव आणि विरुद्ध दिशेने आलेल्या त्या ट्रकचा चालक फुल नशेत असल्याचे सांगण्यात येतेय. पोलिसांनी त्या ट्रक चालकासह ट्रकला ताब्यात घेतलय. हा प्रकार नेमका ट्रक चालकाच्या नशेतून घडला की त्या मागे अन्य काही कट कारस्थान आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी चिखलीकर समर्थकांनी केलीय. नांदेडमध्ये कट कारस्थान करत काही राजकीय कार्यकर्त्यांना अपघात घडवल्या गेले आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका काय होता याचा खुलासा पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.