ETV Bharat / state

आईने केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी केले असे काही - नांदेड क्राईम न्यूज

नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भोकर तालुक्यातील एका गावात आईने स्वतःच्या दोन चिमुकल्यांची हत्या ( Mother Killed His two child in Nanded ) केली आहे. तिने भावाच्या मदतीने पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

Mother Killed His two child in Nanded
आईने केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या
author img

By

Published : Jun 2, 2022, 3:10 PM IST

नांदेड - भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे आईने दोन चिमुकल्यांची हत्या करून, आई व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केल्याची घटना घडली ( Mother Killed His two child in Nanded ) आहे. या प्रकरणी भोकर पोलिसात आज पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी केले असे काही - धुरपताबाई गणपत निमलवाड (वय ३० रा.पांडूरणा) असे प्रमुख आरोपीचे नाव आहे. आरोपी महिला पांडुरणा येथे शेत शिवारात आखाड्यावर पती आणि दोन वर्षीय मुलगा आणि अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह रहात होती. तर सासु - सासरे दोघे अन्य दुसऱ्या शेतात वास्तव्यास होते. आरोपी धुरपताबाई निमलवाड हिने ३१ मे ते १ जून सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान मुलगा दत्ता गणपत निमलवाड (वय. २ वर्षे) व मुलगी अनुसया गणपत निमलवाड (वय ४ महिने) या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली. त्यानंतर आरोपीने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (दोघे रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड) यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला.

Mother Killed His two child in Nanded
पोलीस पाहणी करताना

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - आरोपी आईने असे कृत्य का केले हे समजु शकले नाही, याबाबत गावातील गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - KK Funeral : गायक केके अनंतात विलीन, वर्सोवा येथील स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.