ETV Bharat / state

आईचा मृतदेह घरी आणलेला अन् 'ती' ने दिली दहावीची परीक्षा - दिप्ती भास्कर लोखंडे नांदेड

सध्या दहावीची परिक्षा सुरू आहे. ३ मार्च रोजी दहावीचा पहिला पेपर झाला. दिप्ती दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशीच दिप्तीची आई आजारी पडली. शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास दिप्तीच्या आईचे निधन झाले. शनिवारी दुपारी एक वाजता तिचा संस्कृत विषयाचा पेपर होता. एकीकडे आईचा मृतदेह घरी आणला आणि दिप्ती परीक्षेसाठी गेली. पेपर लिहिताना मन लागत नव्हते. मात्र, या परिस्थितीतही तिने पेपर सोडवला.

एकीकडे आईचे निधन; दुसरीकडे 'ती' ने दिली दहावीची परीक्षा

author img

By

Published : Mar 8, 2020, 8:13 PM IST

नांदेड - आईचे निधन झाल्यानंतरही एका मुलीने धीर धरत दहावीची परीक्षा दिली आहे. दिप्ती भास्कर लोखंडे असे या धैर्यवान मुलीचे नाव आहे. ती शाकुंतल विद्यालयात शिकते.

एकीकडे आईचे निधन; दुसरीकडे 'ती' ने दिली दहावीची परीक्षा

सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ३ मार्च रोजी दहावीचा पहिला पेपर झाला. दिप्ती दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. शिवाजी हायस्कूलमध्ये तिची परीक्षा सुरू आहे. पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशीच दिप्तीची आई आजारी पडली. तिच्या आईला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास दिप्तीच्या आईचे निधन झाले.

हेही वाचा - 'मुलींसाठी लष्कर सुरक्षित क्षेत्र, मराठी मुलींनी लष्करात यावे'

नातेवाईकांनी ही दुःखद वार्ता तिला दिली. शनिवारी दुपारी एक वाजता तिचा संस्कृत विषयाचा पेपर होता. एकीकडे आईचा मृतदेह घरी आले आणि दिप्ती परीक्षेसाठी गेली. पेपर लिहिताना मन लागत नव्हते. मात्र, या परिस्थितीतही तिने पेपर सोडवला. दिप्तीने दाखवलेल्या या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.