नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (दि. 23 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या आलेल्या अहवालानुसार 76 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे.
10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर
मंगळवारच्या 1 हजार 349 अहवालांपैकी 1 हजार 262 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 23 हजार 284 एवढी झाली असून यातील 22 हजार 61 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 418 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 10 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
गोकुंदा येथील एका वृद्धाचा मृत्यू
सोमवारी (दि. 22 फेब्रुवारी)ला किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील 75 वर्षांच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी येथे उपचारावेळी मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 594 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.74 टक्के
मंगळवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, देगलूर कोविड रुग्णालय 1, गोकुंदा कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालयातील 1 व खासगी रुग्णालयातील 8, असे एकूण 32 कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
हेही वाचा - नांदेड महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग लागू