नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी (दि. 23 मार्च) प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालांपैकी 1 हजार 330 अहवाल कोरोनाग्रस्त आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 668 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
रविवार 21 मार्च 2021 रोजी कैलासनगर नांदेड येथील 49 वर्षाच्या एका पुरुषाचा, हदगाव येथील द्रोणागिरीनगर येथील 85 व 48 वर्षाच्या दोन महिलेचा, राज कॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, मिलत्तनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, लोहा तालुक्यातील बोरगाव येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी विनायकनगर नांदेड येथील 72 वर्षाच्या एका महिलेचा व मंगळवार 23 मार्च रोजी हदगाव येथील 79 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर सोमवार 22 मार्च रोजी राजकॉर्नर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा, विद्युतनगर नांदेड येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा खासजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे.
34 हजार 337 सक्रिय रुग्ण
आजच्या 5 हजार 473 अहवालांपैकी 4 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 7 हजार 144 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार आहेत. त्यापैकी 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
- एकूण घेतलेले स्वॅब - 2 लाख 80 हजार 973
- एकूण निगेटिव्ह स्वॅब - 2 लाख 40 हजार 879
- एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 34 हजार 337
- एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 26 हजार 283
- एकूण मृत रुग्णांची संख्या - 668
- उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के
- आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12
- आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-79
- आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 144
- आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59
हेही वाचा - चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या 64 दिवसांत फाशीची शिक्षा