नांदेड - आज जिल्ह्यात 538 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 127 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 1 हजार 683 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 1063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
अशी आहे बेडची संख्या -
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 50, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 60, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत.
अशी आहे आकडेवारी -
- एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या - 84 हजार 127
- एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 75 हजार 901
- एकुण मृत्यू संख्या-1 हजार 683
- उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्के
- आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या -390
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 6 हजार 255
- आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले -194
हेही वाचा - भिवंडीत ब्रश कंपनीमध्ये भीषण आग; 13 गोदामे जळून खाक