ETV Bharat / state

Mobile Snatchers Arrested : मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अटक; 21 मोबाइल जप्त

author img

By

Published : Oct 28, 2022, 10:30 PM IST

शहराच्या विविध भागात एकट्या जाणारे नागरिक आणि महिलांचे मोबाईल चोरणाऱ्या, त्याचबरोबर गळ्यातील चैन चोरणाऱ्या आणि दुचाकी पळविणाऱ्या टोळीला वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक (Mobile snatcher arrested ) केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 21 मोबाईल (21 stolen mobile phones seized), दुचाकी असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. (mobile phone thieves gang arrested)

Mobile Snatcher Arrest
Mobile Snatcher Arrest

नांदेड : शहराच्या विविध भागात एकट्या जाणारे नागरिक आणि महिलांचे मोबाईल चोरणाऱ्या, त्याचबरोबर गळ्यातील चैन चोरणाऱ्या आणि दुचाकी पळविणाऱ्या टोळीला वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक (Mobile snatcher arrested ) केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 21 मोबाईल (21 stolen mobile phones seized), दुचाकी असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे. (mobile phone thieves gang arrested)

मोबाईल चोरास पकडताना फिर्यादी जखमी - दिनांक 27 आक्टोबर रोजी चंद्रमुनी गंगाराम इंगोले यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी ते हिंगोली गेट येथे फटाके आणण्यासाठी गेले असताना दोन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर येऊन त्यांच्या खिशातील मोबाईल चोरी करीत असताना चोरट्यास पकडले. मात्र त्यांनी ओढत नेल्याने त्यांच्या कंबरेला व दोन्ही पायाला मुक्का मार लागला होता. पेट्रोल पंपाच्या बाजूस असलेले लोक आल्याने चोरट्यांनी माझा मोबाईल फेकून तेथून पळ काढला. अशा तक्रारीवरुन वजिराबाद ठाण्यात येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा तपास पोउपनि आगलावे यांच्याकडे देण्यात आला होता.

मोबाईल चोरल्याची आरोपीची कबूली - आदेशाप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीस विचारपूस करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे आरोपी शैलेश मिलींद नरवाडे (वय 21), राजरत्न मारोती कदम (वय 26) यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी संबंधित गुन्हा केल्याची कबुली दिली. हिंगोली गेट ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते बसस्टैंड व चंदासिंघ कॉर्नर याठिकाणी धावत्या दुचाकीवरून अनेक लोकांचे मोबाईल हिसकावून घेतल्याचे आरोपीने सांगितले. त्यांच्या घराची झडती घेतली असता घरझडतीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 21 मोबाईल व अन्य साहित्य असा दोन लाख 34 हजार रुपयाचे मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस कंपनीची व्हीक्टर दुचाकी ६० हजार असे एकूण दोन लाख 94 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. वर नमुद गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरीबाबत वरिष्ठांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.