नांदेड - संजय राऊत हे महाभारतातले संजय आहेत का असा सवाल शामसुंदर शिंदे यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेची केवळ एक जागा निवडून आली होती. त्यामुळे संजय राऊत यांनी कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे ( Shamsunder Shinde criticize sanjay raut ) यांच्यासह इतर दोन आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान ( Shamsunder Shinde on sanjay raut ) केले नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आमदार शामसुंदर शिंदे यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. हस्तिनापूरला बसून कुरुक्षेत्रावर काय सुरू आहे ते राऊत पाहत ( Shamsunder Shinde on rajya sabha election voting ) असल्याचा टोमणा आमदार शिंदे यांनी लगावला आहे.
हेही वाचा - Acb Trap Police : लाच स्वीकारणाऱ्या पोलीस शिपायासह एकाविरुद्ध गुन्हा
अपक्ष मतांमुळे शिवसेना उमेदवारांचा पराभव - राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे एकमेव उमेदवार या निवडणुकीत निवडून आले. तर, भाजपाने राज्यसभेच्या तीन जागांवर यश मिळवले. या निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये आरोप-प्रतिआरोप सुरू झाले आहेत. भाजपाने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजय मामा शिंदे, या सोबतच आमदार शामसुंदर शिंदे यांनी देखील शिवसेना उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत हे तर महाभारतातले संजय - राज्यसभा निवडणुकीनंतर शेकापचे आमदार शामसुंदर शिंदे याचे नाव चांगलेच चर्चेत आले. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या सहयोगी पक्षाच्या आमदारांनी सेना उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप केला आहे. त्यात लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी आरोप केला आहे. त्यावर आमदार शिंदे यांनी देखील राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. हस्तिनापूरला बसून कुरुक्षेत्रावर काय सुरू आहे ही सांगण्याची महाभारतातील संजयची विद्या राऊत यांना प्राप्त झाली असेल तर त्याचा आनंद वाटेल. तसेच, ही निवडणूक परस्पर विश्वासाचा भाग आहे, शेकाप ही महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष आहे, याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून मतदान केले असल्याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.