ETV Bharat / state

'खासदार चिखलीकर माफी मागा, अन्यथा...'

जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून बंब यांच्या चौकशी पत्राची दखल घेऊ नका असे म्हटले होते. तसेच बंब हे ब्लॅकमेलर आहेत, असा आरोपही चिखलीकरांनी केला होता. यावर बंब यांनी चिखलीकरांना वकिलामार्फत मानहानीचा दावा दाखल करणारी नोटीस बजावली आहे.

'ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या खासदार चिखलीकरांना आमदार प्रशांत बंबची नोटीस
'ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या खासदार चिखलीकरांना आमदार प्रशांत बंबची नोटीस
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:08 AM IST

नांदेड - जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करणारे भाजप गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 'ब्लॅकमेलर' असा उल्लेख केला होता. या विरोधात प्रशांत बंब यांनी चिखलीकर विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणारी नोटीस वकिलामार्फत बजावली आहे.

एका रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३३ कोटींची तरतूद केली होती. परंतु, या रस्त्याच्या कामाची निविदा भरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला असल्याने ही निविदा शासनाकडून रद्द करण्यात आली होती. मात्र, निविदा प्रक्रियेत पुन्हा हे काम त्याच कंपनीला नाव बदलून देण्यात आले. इतकेच नाही तर, ३३ कोटींचे काम ३५ कोटींवर गेले. या संदर्भात आमदार बंब यांनी आक्षेप नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर खासदार चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून आमदार बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका असे म्हटले होते. तसेच आमदार बंब हे 'ब्लॅकमेलर' असल्याचा आरोपही चिखलीकरांनी केला होता.

हेही वाचा - विषय समित्यांच्या सभापतींची आज निवड, पालकमंत्री जिल्ह्यात दाखल

खासदार चिखलीकरांकडून बंब यांची बदनामी सुरूच असल्यामुळे त्यांनी अ‌ॅड. सागर लड्डा यांच्यामार्फत चिखलीकरांना नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. १५ दिवसात माफी मागितली नाही तर, २३ कोटींचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येईल असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - ...म्हणून पोलीस ठाण्यातच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

Intro:ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या खा. चिखलीकरांना आ.प्रशांत बंबची नोटीस 

नांदेड: जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करणारे भाजपचे गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांचा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 'ब्लॅकमेलर' असा उल्लेख केला होता. या विरोधात प्रशांत बंब यांनी चिखलीकर यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणारी नोटीस वकिलामार्फत बजावली आहे.Body:'ब्लॅकमेलर' म्हणणाऱ्या खा. चिखलीकरांना आ.प्रशांत बंबची नोटीस 

नांदेड: जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करणारे भाजपचे गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांचा नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 'ब्लॅकमेलर' असा उल्लेख केला होता. या विरोधात प्रशांत बंब यांनी चिखलीकर यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणारी नोटीस वकिलामार्फत बजावली आहे.

खासदार चिखलीकर यांनी आपली जाहीर माफी मागावी, अन्यथा तुमच्याविरुद्ध २३ कोटींचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. नांदेड जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे केली होती .

एका रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ३३ कोटींची तरतूद केली होती. परंतु या रस्त्याच्या कामाची निविदा भरलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे ही निविदा शासनाकडून रद्द करण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेत पुन्हा हे काम त्याच कंपनीला नाव बदलून देण्यात आले. इतकेच नाही तर ३३ कोटींचे काम ३५ कोटींवर गेले.
या संदर्भात प्रशांत बंब यांनी आक्षेप नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून आमदार प्रशांत बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका असे म्हटले होते. तसेच प्रशांत बंब हे 'ब्लॅकमेलर' असल्याचा आरोपही केला होता.
बंब यांची बदनामी चिखलीकर यांकडून सुरूच असल्यामुळे त्यांनी अँड. सागर लड्डा यांच्यामार्फत खासदार चिखलीकर यांना नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे. पंधरा दिवसात माफी मागितली नाही तर २३ कोटींचा मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करण्यात येईल असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.