ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीच्या जीआरची केली होळी

'भारत बंद'ला प्रतिसाद म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती.  बंदमुळे बाजारात आज शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, शासनाकडून जाहीर करण्यात आलेली शेतकरी  कर्जमाफी तसेच हमीभाव या दोन्हीही योजना फसव्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

GR
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीच्या जीआरची केली होळी
author img

By

Published : Jan 8, 2020, 5:16 PM IST

नांदेड - जिल्ह्यात 'भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला पाठिंबा देत अर्धापुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीच्या जीआरची केली होळी

'भारत बंद'ला प्रतिसाद म्हणून शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवली होती. बंदमुळे बाजारात आज शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला. दरम्यान, शासनाकडून जाहीर करण्यात आलेली शेतकरी कर्जमाफी तसेच हमीभाव या दोन्हीही योजना फसव्या आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

हेही वाचा - मुंबईत 'भारत बंद'चा परिणाम नाही; जनजीवन सुरळीत

आरसीइपी करार झाल्यास देशातील शेतकरी उद्ध्वस्त होईल. आरसीइपी करारातून दुग्धजन्य पदार्थ व शेतीमाल वगळण्यात यावा, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यात यावा, शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, महापोर्टल बंद्द करण्यात यावे आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहे. यावेळी, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ कदम कोंढेकर, तालुकाध्यक्ष मारोत भांगे पाटील, किसन मुस्तरे आदींसह उपस्थित होते.

Intro:नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बंदला समिश्र प्रतिसाद; कर्जमाफीच्या जीआर ची होळी....!

नांदेड: जिल्ह्यात भारत "बंदला" संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहुन आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमुळे बाजारात आज शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सर्वांनीच सहभाग नोंदवला. तर ग्रामीण भागात मात्र समिश्र प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरची अर्धापुर येथे होळी करण्यात आली. Body:नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बंदला समिश्र प्रतिसाद; कर्जमाफीच्या जीआर ची होळी....!

नांदेड: जिल्ह्यात भारत "बंदला" संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वतःहुन आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदमुळे बाजारात आज शुकशुकाट जाणवत होता. अत्यावश्यक सेवा वगळता बंदमध्ये सर्वांनीच सहभाग नोंदवला. तर ग्रामीण भागात मात्र समिश्र प्रतिसाद मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाविकास आघाडीच्या सरकारने काढलेल्या कर्जमाफीच्या जीआरची अर्धापुर येथे होळी करण्यात आली.

शासनाकडून जाहीर करण्यात आलेली शेतकरी  कर्जमाफी आणि हमीभाव ही दोन्हीही मुद्दे चुकीच्या पद्धतीने निकष लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला.
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व शेतीमालाला दीडपट हमीभाव या दोन्हीही मुद्यासाठी चुकीचे निकष लावून शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी तसेच आरसीइपी करार झाला तर देशभरातील शेतकरी उद्ध्वस्त होईल म्हणून आरसीइपी करारातून दुग्धजन्य पदार्थ व शेतीमाल वगळण्यात यावे, शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यात यावा व शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, महापोर्टल परीक्षा रद्द करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ८ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला पाठिंबा देत जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी बंद पाळण्यात आला.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ कदम कोंढेकर, तालुकाध्यक्ष मारोतराव भांगे पाटील, किसनराव मुस्तरे आदीसह अनेक कार्यकर्ते बंदमध्ये सहभागी झाले होते.

                           Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.