नांदेड - कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात संदर्भात लादलेल्या अटी अन्याय कारक आहेत. या अटी तात्काळ रद्द कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.
- करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. शिवनेरी अथवा कोणत्याही गडावर एकत्र जमू नये.
- कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
राज्यभर शिवजयंती जल्लोषात साजरी होणार-
राज्य सरकारने शिवजयंती साजरी करण्यात बाबत अटी लादल्या आहेत. मात्र शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे. अशी भूमिका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. राज्यभर जल्लोषात शिवजयंती साजरे करण्याचे अवाहन केले आहे.
हेही वाचा- राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान; शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक