नांदेड- मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा सत्कार केल्याप्रकरणी नांदेडतील एका हॉटेल चालकाला मराठा समाजाने जाब विचारला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार कसा करता असे म्हणत सिटी प्राईड हॉटेल समोर धरणे आंदोलन करण्यात आले. हॉटेल चालक व्यंकट चारी यांच्या जाहीर माफी नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नांदेडात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा सत्कार करणाऱ्या एका फोटोमुळे मराठा समाजात संताप पसरला आहे. हॉटेल सिटी प्राईड येथे हा सत्कार करण्यात आला होता.
हेही वाचा-पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात 1 हजार 400 कोरोनाबाधितांवर उपचार, डॉ. गिराम यांची माहिती
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांचा सत्कार
मराठा रक्षण विरोधात अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुढील काळात या याचिकेवर सुनावणी होऊन मराठा आरक्षण रद्द करण्यात आले. यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडतील रहिवासी आहेत. सदावर्ते यांच्या विजयाबद्दल त्यांच्या काही हितचिंतकांनी नांदेडतील सिटी प्राईड हॉटेल येथे सत्कार सभा बोलावली होती. या कार्यक्रमात सिटी प्राईड हॉटेलचे मालक व्यंकट चारी यांनीदेखील सदावर्ते यांना पुष्पहार घालून सत्कार केला. अशी बातमी स्थानिक माध्यमात आली होती. यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर मराठा संघटनांनी सिटी प्राईड हॉटेल चालकाला धारेवर धरत आंदोलन केले.
हेही वाचा-खुशखबर.. येत्या 3 दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार
हॉटेल सिटी प्राईडचे मालक व्यंकट चारी यांची जाहीर माफी-
मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांवर निषेध करण्याची भूमिका मराठा संघटनांनी घेतली होती. यानंतर समाज माध्यमांवर बुधवारी सायंकाळी चार वाजता हॉटेल समोर जाऊन आंदोलन करणाऱ्या पोष्टदेखील व्हायरल झाल्या आहेत. छावा क्रांतिवीर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेश मोरे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, नांदेड मराठा समूहाचे संथापक संतोष पाटील शिंदे, विलास घोरबांड यांच्यासह मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर हॉटेल चालक व्यंकट चारी यांनी जाहीर माफी मागितली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हॉटेल बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
हेही वाचा-रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस; अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन येथे दरड कोसळली