नांदेड - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मल्हार सेनेच्या वतीने नांदेडमध्ये अर्धजल समाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
हेही वाचा - खडसेंचे 'ते' वक्तव्य पूर्णपणे खोटे, अंजली दमानियांची टीका
विष्णुपुरी जलाशयाच्या पाण्यात उतरून कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी केली. यावेळी मल्हार सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मल्हार सेना सातत्याने आंदोलन करणार असून यानंतर जेलभरो आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.