ETV Bharat / state

गोळीबार करत व्यापाऱ्याचे साडेसात लाख लुटले, दोन तासात आरोपी गजाआड

पोलिसांनी चोरटे गेलेल्या दिशेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासातच ३ आरोपीसह रोख रक्कम साडेसात लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले.

Nanded
व्यापाऱ्याला लुटले
author img

By

Published : Jun 2, 2020, 7:28 PM IST

नांदेड - तेंलगणा राज्यातील पिटलम येथून साडेसात लाख रुपये घेऊन येणाऱ्या कासराळी येथील व्यापाऱ्याला गोळीबार करून लुटल्याची घटना आहे. ही घटना नरसी बिलोली रोडवरील लोहगाव येथील वळणावर घडली.

याबाबत 'ईटीव्ही भारत'ला मिळालेली माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार मोटारसायकलवरून रोख रक्कम साडेसात लाख रुपये येत होते. त्यावेळी नरसी बिलोली रोडवरील लोहगावजवळील वळण रस्त्यावर त्यांना तिघांनी अडवून मारहाण करत पैश्याची बॅग घेण्याचा प्रयत्न करत केला.

यावेळी संजय उपलंचवार हे विरोध होते. दरम्यान, तिघांपैकी एकाने जवळील पिस्टल काढून संजय उपलंचवार यांच्यावर गोळीबार केला असता, गोळी त्यांच्या कपाळावर चाटून गेली. उपलंचवार जखमी झाल्यानंतरही विरोध करत होते. दरम्यान, तिघांनी पैश्याची बॅग जबरदस्तीने हिसकावून परिसरातील शेतात पसार झाले.

संजय उपलंचवार यांनी लोहगाव येथे पोहोचून गावकऱ्यांना गोळा करून पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी चोरटे गेलेल्या दिशेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही तासातच ३ आरोपीसह रोख रक्कम साडेसात लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील आरोपी मिर्झा शब्बर बेग,शेख मोईन शेख मेहमूद, सुनील सुरेश सुळगेकर या तिघांविरुद्ध विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.