ETV Bharat / state

Lathicharge on Maratha Protester : लाठीचार्जच्या निषेधार्थ माहूरमध्ये कडकडीत बंद - नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध

Lathicharge on Maratha Protester : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ नांदेडच्या माहूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर टायरही जाळले. यासोबतच सकल मराठा समाजाच्या वतीनं नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टायर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Lathicharge on Maratha Protester
Lathicharge on Maratha Protester
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 7:05 PM IST

मराठा नेत्याची प्रतिक्रिया

नांदेड Lathicharge on Maratha Protester : जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा आज नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी टायर जाळण्याचा प्रयत्न देखील झाला. तसंच या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी नांदेड शहरात बंदही पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा संघटना मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्ह्यात संचारबंदी लागू : नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी 10 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं अवाहन जिल्हा पोलीस विभागानं केलं आहे. तसंच अफवांवर विश्वास ठेऊ नये असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दोषी पोलिसांवर कडक कारवाई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी बळाचा गैरवापर केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. या घटनेबाबत राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार मराठा समाजाच्या नेत्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. राज्याच्या काही भागांत बसेसवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना घडत असून त्या तातडीनं थांबवण्याची गरज आहे.

हिंसाचार थांबवण्याचं अवाहन : दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्याच राज्याच्या मालमत्तेचं नुकसान होतंय. आजवर लोकशाही मार्गानं सुरू असलेलं आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. राज्यातील काही भागात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी मी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो. राज्याच्या साधनसंपत्तीचं कोणतेही नुकसान होणार नाही. आंदोलनामुळं आपल्या माता, भगिनी, भावांच्या जीवाला धोका होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar PC : मुंबईच्या सूचनेवरून मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज - शरद पवारांचा घणाघात
  2. Prithviraj Chavan On Lathicharge : आंदोलन दडपण्याचा आदेश मुंबईतूनच - पृथ्वीराज चव्हाण
  3. Nana Patole On Baton Charge Jalna : राहुल गांधीचं भाषण टीव्हीवर दिसू नये म्हणून गृहमंत्र्यांच्या आदेशानेच लाठीचार्ज - नाना पटोले यांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.