नांदेड - जिल्ह्यात शुक्रवारी 1 हजार 650 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 5 हजार 441 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 53 हजार 992 एवढी झाली असून यातील 41 हजार 448 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. तसेच 11 हजार 271 रुग्ण उपचार घेत आहे. त्याचप्रमाणे 5 ते 8 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 23 एवढी झाली आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहित
एकूण घेतलेले स्वॅब - 3 लाख 61 हजार 948
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 3 लाख 772
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 53 हजार 992
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 41 हजार 448
एकूण मृत्यू संख्या - 1 हजार 23
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.76 टक्के
आज (शुक्रवारी) स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 28
आज (शुक्रवारी) स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या - 26
आज (शुक्रवारी) प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - 390
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती - 11 हजार 271
आज (शुक्रवारी) रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले - 189