ETV Bharat / state

Larvae in the meal : जेवणात निघाल्या चक्क अळ्या, नायगांव येथील मागासवर्गीय वसतिगृहातील प्रकार - नायगांव येथील मागासवर्गीय वसतिगृहात अळ्या

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मागासवर्गीय वसतीगृहात मुलांच्या जेवणात अळ्या निघाल्या (Larvae in the meal ) आहेत. दरम्यान, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. याची त्वरित चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल त्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:53 PM IST

नांदेड : नायगाव येथील मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलांच्या जेवणामध्ये अळ्या निघाल्याचा (Larvae in the meal) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाला कंटाळुन वसतिगृहातील मुलांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु तेथील अधिकाऱ्यांनी हा आमचा विभाग नाहीये संबंधित विभागाकडे जाऊन तक्रार करा, अस सांगितल्याने मुलं तिथून निघून गेली. हा सर्व प्रकार पाहता सामाजिक न्याय विभाग आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नायगांव येथील मागासवर्गीय वसतिगृहातील जेवणात चक्क अळ्या निघाल्या

निकृष्ठ दर्जाचे जेवण - मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना शिक्षणाची चांगली सोय व्हावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्यात मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृहे १९९२ साली सुरू करण्यात आली. यात इतर सोयी सुविधा सह निवास व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येते. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुुक्यात याच विभागांतर्गत येणारं एक शासकीय वसतिगृह २०११-१२ साली सुरू करण्यात आले आहे. परंतू या वसतिगृहात अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष - करपलेल्या भाज्या, डाळीचा कमी वापर असेलेले निव्वळ पाण्यासारखे वरण, भाज्यात अळ्या देखील निघतात आम्ही याकडे दुर्लक्ष केले होते. पण हे प्रमाण काही कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन आम्ही तहसील कार्यालयात गेलो परंतु हा विभाग आमच्या अंतर्गत येत नसल्यामुळे संबंधित विभागाकडे जा, असे सांगितल्याने आम्ही माघारी आल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे हा प्रकार लक्षात घेता संबंधित विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दोषींवर कारवाई करण्यात येईल - दरम्यान समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. याची त्वरित चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल त्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.