नांदेड - लॉकडाऊनमुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेक मजूर आपापल्या घराकडे परतत आहेत. बाहेरगावाहून आलेल्या मजुरांना क्वारंटाइन केलेल्या शाळेत विषारी सापाची पिल्ले आढळून आल्याने मजुरांची तारांबळ उडाली आहे.
किनवट तालुक्यातील शिवनी येथील काही मजूर कामाच्या निमित्ताने शहराकडे गेले होते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे मजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेक मजूर आपापल्या घराकडे परतत आहेत. गावाकडे परतलेल्या मजुरांना शिवनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. पण आता शाळेत सापांची पिल्ले आढळल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिवनी येथील शाळेत मजुरांना राहण्यायोग्य कुठलीच व्यवस्था नसल्याने मजुरांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. गावचे सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक यांच्याकडे मजुरांनी तक्रार केली.