नांदेड - किरीट सोमैया हे ईडी आणि आयटीचे प्रवक्ते आहेत का? असा असा सवाल आमदार रोहीत पवार यांनी केला आहे. माझ्याकडे पवार कुटुंबियांविरोधत बेनामी संपत्तीचे पुरावे आहेत, ते पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचे असल्याचे सिद्ध करून दाखवावे असे चॅलेंज किरीट सोमैया यांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी वरील टीका केली आहे. जी कारवाही करायची आहे ते ईडी आणि आयटी करेल, किरीट सोमैया आम्हला चॅलेंज करणारे कोण आहेत असा प्रश्नही रोहित पावर यांनी उपस्थित केला आहे. ते नांदेड दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या आम्हला चॅलेंज करणारे कोण
नांदेड-किरीट सोमय्या हे ईडी आणि आयटीचे प्रवक्ते आहेत का? असा असा सवाल आमदार रोहीत पवार यांनी केला आहे. माझ्याकडे पवार कुटुंबियांविरोधत बेनामी संपत्तीचे पुरावे आहेत, ते पुरावे पवार कुटुंबीयांनी चुकीचे असल्याचे सिद्ध करून दाखवावं असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना रहित पवार यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. जी कारवाही करायची आहे ते ईडी आणि आयटी करेल, किरीट सोमय्या आम्हला चॅलेंज करणारे कोण आहेत.. असा सवाल रोहित पावर यांनी केला आहे. देव दर्शनासाठी रोहित पावर नांदेड येथे आले होते. यावेळी मुबई तक ला रोहित पावर यांनी प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत
भाजपा नेते किरीट सोमेया यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. पवार कुटुंबियांवर आरोप करत सोमैयांनी शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. सोमयांनी केलेल्या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. रोहित पवार माहूर येथे देवदर्शनासाठी आले असताना किरीट सोमैया यांच्यावर आरोप केले आहेत.
रोहित पवार नांदेड दौऱ्यावर-
रोहित पवार म्हणाले, 'मी आधीही बोललो आहे की, त्यांना ईडी, सीबीआय, आयटीकडून खास बातमी मिळते. विशेष म्हणजे ती बातमी देऊन त्यावर बोलायला सांगितले जाते. कारण ईडी आणि संबंधित यंत्रणांच्या लोकांना ती बातमी देता येत नाही. त्यांना या धाडीतून काही सापडलेले नाही. महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ईडी, सीबीआयचे प्रवक्ते किरीट सोमय्या बोलत आहेत, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
हेही वाचा - हिंदूत्वाच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचे नाव डांबराने लिहले जाईल -अतुल भातखळकर