नांदेड - जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसापासून सोयाबीनसह कपाशी, हळद, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली.
सोयाबीनची पेरणी ‘बीबीएफ’वर -
यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने होत आहे. जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात १६६.४० मिलीमीटरनुसार २०.४० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शेतकरी पेरणींच्या कामांना लागले आहेत. यंदा पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून होता. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागील पाच ते सहा दिवसापासून कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. यासोबतच जिरायती भागात सोयाबीन, कापूस, ज्वारी यासह आंतरपिके म्हणून तूर, मूग, उडीद, तीळ, कारळ या पिकांचीही लागवड केली जात आहे. यंदा शेतकरी पारंपरिक बैलजोडीच्या सहायाने तिफणीच्या माध्यमातून पेरणी करण्यापेक्षा यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करण्यावर अधिकचा भर दिला आहे. तर हळद लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहेत.
जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टर पेरणी -
आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४८ हजार ९१५ हेक्टरनुसार २०.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सुत्रांनी दिली. जिल्ह्यात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होइल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. यात सोयाबीन चार लाख हेक्टर तर सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु यंदा कपाशीच्या लागवडीत घट होवून सोयाबीनचा पेरा वाढेल अशी शक्यता कृषी निविष्ठा विक्रेते व्यक्त करीत आहेत.
सोयाबीनची पेरणी शंभर मिलीमीटर पावसानंतरच करावी -
पेरणीयोग्य पाऊस झालेल्या भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरवात केली आहे. पिकांची उगवणही चांगली होत असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून दिसून आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी शंभर मिलीमीटर पावसानंतरच करावी. अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात खरिपाची पेरणी २० टक्के पूर्ण.. हळद, कपाशी लागवडही सुरू - नांदेड खरीप पेरणी
नांदेड जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसापासून सोयाबीनसह कपाशी, हळद, तुर, मुग, उडीद, ज्वारी या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे.