ETV Bharat / state

नांदेडमध्ये खरीपपूर्व मशागत अंतिम टप्प्यात, आठ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित

कोरोना आणि लॉकडाऊनचे सलग दोन वर्षे संकट पचवून शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. यंदा खरीप पेरणी साधारणतः आठ लाख हेक्टरवर होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

author img

By

Published : May 29, 2021, 8:21 PM IST

विशेष बातमी
विशेष बातमी

नांदेड - कोरोना आणि लॉकडाऊनचे सलग दोन वर्षे संकट पचवून शेतकरी पुन्हा एकदा खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. सर्वत्र कामे बंद असताना 'त्याला ना बंद, ना सुट्टी ना आराम' येणाऱ्या काळात जगाला जगविण्यासाठी अन्नधान्याचे उत्पन्न काढण्यासाठी तो कामात गुंतला आहे. मशागत शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या भर उन्हात खरीपपूर्व हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. खरीप पेरणी साधारणतः आठ लाख हेक्टरवर होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

नांदेडमध्ये खरीपपूर्व मशागत अंतिम टप्प्यात, आठ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षित

परिस्थितीशी दोन हात करत खरिपाच्या तयारीला
जगावर कुठलेही संकट येवो त्याचा पहिला मार शेतकऱ्यांच्या माथी असतो. कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी अवकाळीचे संकट हे नित्याचेच असते. यातून कसे-बसे उत्पन्न काढले तर योग्य दर मिळत नाही. आता कोरोनाचे संकट आल्यानंतर पहिला फटका हा शेतकऱ्यांनाच बसला आहे. दळण-वळण बंद झाल्यामुळे शेतमालाचे भाव प्रचंड खाली कोसळले. यातून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. जगातील कितीही संकटे शेतकऱ्यांवर कोसळली तरी मागे न हटता परिस्थितीशी तो दोन हात करतच असतो. यातच, रब्बी हंगाम संपतो ना संपतो शेतकरी उन्हा-तान्हात खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.

'यंदा तरी कष्टाचे चीज होईल ही अपेक्षा'
सध्या शेतामध्ये शेतकरी खरीपपूर्व मशागतीत गुंतला आहे. नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू, ज्वारी आदी पिकांचा हंगाम संपला असून शेतामध्ये नांगरणी-वखरणी सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांनी हळदीचे बेड तयार करून ठेवली आहेत. तर काहींनी लागवडीलाही सुरुवात केली आहे. जून महिन्यात मृग नक्षत्रात वेळेवर पाऊस झाला तर पेरणीत मागे पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी आपली तयारी सुरू ठेवली आहे. जगाला अन्न पुरविण्याचे काम बळीराजा करत असून त्यांच्या कष्टाचे चीज कधी तरी व्हावे हीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

२०२१मधील खरीप हंगामातील प्रस्तावित क्षेत्र
एकुण ८ लाख ४ हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात सर्वाधिक सोयाबीन ४ लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच कापसाचे २ लाख ३० हजार हेक्टर, ज्वारी ३४ हजार ५०० हेक्टर, मुग २८ हजार हेक्टर, तूर इतर पिके ३१०० हेक्टर असे क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

हेही वाचा - 'मराठा आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने संसदेमध्ये भूमिका घ्यावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.