नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा अर्बन बॅंकेवर आयकर विभागाने छापे टाकून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत बॅंकेने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची ही चौकशी होत आहे. दरम्यान देगलूर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हेतूने ही कार्यवाही असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
कारखान्यांची चौकशी राजकीय हेतूने प्रेरित
सदरील कारखाने हे माझ्या मालकीचे नसून ते सहकारी साखर कारखाने आहेत. कर्ज घेणे ही प्रक्रिया सुरूच असते. अनेकवेळा चौकशाही झाल्या आहेत. देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीचं मतदान हे 30 ऑक्टोबरला आहे. निवडणुकीनंतर ही चौकशी करता आली असती पण दोन दिवस अगोदर ही कारवाई होत आहे. केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही चौकशी सुरू आहे. निवडणुकीवर याचा परिणाम व्हावा यासाठी ही चौकशी लावली असावी. असा आरोप ही अशोक चव्हाण यांनी केला.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी