नांदेड - भारतीय संविधानास ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने काल मंगळवारी नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये संविधान दिवस पाळण्यात आला. या वर्षभरात २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० दरम्यान विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.
देशभरात काल 'संविधान दिवस' साजरा करण्यात आला. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली होती. या दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आजोयन करण्यात आले होते. रेल्वे विभागातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानास ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने देशभरात २६ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०२० दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत तीन टक्क्यांनी वाढ...!
या अंतर्गत नांदेड रेल्वे विभागातील सर्व महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर आणि विभागीय रेल्वे कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. तर, नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा, अप्पर विभागीय व्यवस्थापक श्री नागभूषण यांच्यासह रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा केला गेला. श्री राभा यांनी यावेळी उपस्थितांना शपथ दिली. तसेच नांदेड, परभणी, पूर्णा, जालना, औरंगाबाद, हिंगोली, वाशीम आणि इतर रेल्वे स्थानकावरही 'संविधान दिवस' निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
हेही वाचा - 'राजकारण खूप खालच्या पातळीवर गेलंय, 'क्या हम गुलामही अच्छे थे क्या?''