ETV Bharat / state

रब्बीच्या पीक क्षेत्रामध्ये वाढ, खराब हवामानामुळे शेतकरी संकटात

खरीप पीक काढणीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जमीनीमध्ये ओल होती, पाणी साठ्यात वाढ झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. मात्र आता थंडी अभावी रब्बीचे पिके धोक्यात आली आहेत.

रब्बीच्या पीक क्षेत्रामध्ये वाढ
रब्बीच्या पीक क्षेत्रामध्ये वाढ
author img

By

Published : Jan 24, 2021, 9:47 PM IST

नांदेड - खरीप पीक काढणीच्या हंगामात अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जमीनीमध्ये ओल होती, पाणी साठ्यात वाढ झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. जिल्ह्यात दोन लाख 70 हजार हेक्टरपर्यंत रब्बीच्या पीकक्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र आता थंडी अभावी रब्बीचे पिके धोक्यात आली आहेत.

हरभरा पिकाची सर्वाधिक पेरणी

जिल्ह्यात रब्बी पिकाच्या क्षेत्रात दोन लाख सत्तर हजार हेक्टरची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख सात हजार ३०५ हेक्टरवर हरभरा, २७ हजार ८२५ हेक्टरवर ज्वारी, तर २५ हजार २२७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. सदरील पेरणी क्षेत्राची टक्केवारी अंतिम असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

रब्बीच्या पीक क्षेत्रामध्ये वाढ

परतीचा पाऊस रब्बीसाठी पोषक

परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले तरी हा पाऊस रब्बीसाठी पोषक ठरणारा होता. जिल्ह्यात यंदा परतीच्या झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून, वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले होते. तसेच खतांचेही नियोजन केले होते.

हरभऱ्याचे क्षेत्र तिपटीने वाढले

परतीचा पाऊस रब्बीसाठी लाभदायक ठरला. जमिनित ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हरभऱ्याच्या पेरणीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८८ हजार ३५ हेक्टर आहे. मात्र यात तिपटीने वाढ झाली. आजपर्यंत दोन लाख सात हजार ३०५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यासोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र सरासरी १८ हजार ४६३ हेक्टर असते मात्र त्यामध्ये वाढ होऊन पेरणी क्षेत्र 25 हजार 227 हेक्टर वर पोहोचले आहे. तर ज्ववारीचे सरासरी पेरणी क्षेत्र 26 हजार 951 हेक्टर असते, त्यामध्ये वाढ होऊन, हे क्षेत्र २७ हजार ८२५ हेक्टरवर पोहोचले आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हरभरा : दोन लाख ७ हजार ३०५,
गहू : २५ हजार २२७,
रब्बी ज्वारी : २७ हजार ८२५,
रब्बी मका : तीन हजार ७८५,
करडई : दोन हजार ७३७.
एकूण दोन लाख ७० हजार ६३ हेक्टरवर पेरणी झाली

थंडी कमी झाल्याने शेतकरी धास्तावले

रब्बीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली अहे, मात्र आता थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाचा कडाक वाढला आहे. या प्रतिकूल वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असून, शेतकरी संकटात सापडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.