ETV Bharat / state

अर्धापुरात अग्निशमन दलाची इमारत अर्धवटच; संबंधितांवर कारवाईची मागणी - जिल्हाधिकारी

जिल्ह्यात महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये अर्धापुर येथे अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम करायचे होते. हे बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सादर करुन अपहार केला. अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे देवून, या प्रकरणी चौकशी करुन संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अग्निशमन दलाच्या इमारतीचे अर्धवट स्थितीत बंद पडलेले बांधकाम
author img

By

Published : Jul 17, 2019, 12:02 PM IST

नांदेड- जिल्ह्यात महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ मध्ये अर्धापूर येथे अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम करायचे होते. मात्र, हे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी सादर करुन अपहार केला. अशी तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे दिली आणि या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अग्निशमन दलाच्या इमारत बांधकामासाठी शासनाने २०१६-१७ मध्ये ६७ लाख ९४ हजार ६४० रुपायांचा निधी मंजूर केला होता. यात नगर पंचायतीचा २० टक्के हिस्सा, १६ लाख ९८ हजार ६६० रुपये मिळवून ८४ लाख ८३ हजार ३०० रुपये निधीत, एका वर्षात सर्व अटींसह इमारत पूर्ण करणे बंधनकारक होते. परंतु इमारतीचे बांधकाम अद्याप अर्धवट स्थितीत बंद पडलेले आहे. हे काम पूर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १०० टक्के विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी प्रशासनाकडे सादर केले. यावरुन या कामात अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे.

गेल्या वर्षी १८ सप्टेंबर २०१८ ला, अर्धापूर शहराच्या फुले नगर भागातील एका घराला आग लागून एक महिला मृत्यूमुखी पडली होती. यावेळी येथे अग्निशमन दलाची व्यवस्था नसल्यामुळे नांदेडहून अग्निशमन दलाचे वाहन बोलवावे लागले होते. यामुळे लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे गरजेचे आहे. तसेच शहरात अग्निशमन दलाची व्यवस्था नसतानाही, नगर पंचायत मालमत्ता धारकांकडून अग्निशमन कर वसूल करते. अनेक प्रकरणात माहितीच्या अधिकारात मागीतलेली कोणतीही माहिती नगर पंचायतीकडून पुरविली जात नाही, असे देखील या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

अर्धापूर येथील नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून, अनेक विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला. ही कामे शासकीय कंत्राटदारांच्या नावे घेऊन मुख्याधिकारी व काही नगरसेवकांनी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केलीत, यामुळे प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबंधीताविरुद्ध कारवाई करावी असे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी(नपप्र), खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी अर्धापूर यांना देण्यात आले आहे.

Intro:अग्निशमन दलाची इमारत अर्धवटच....!

मुख्याधिका-यांनी दिला काम पुर्ण झाल्याचा दाखला.

------------------------------------
नांदेड: महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये अर्धापुर थेथील अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १००% विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिका-यांनी सादर करुन अपहार केला असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे देवून या प्रकरणी चौकशी करुन संबंधीताविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.Body:अग्निशमन दलाची इमारत अर्धवटच....!

मुख्याधिका-यांनी दिला काम पुर्ण झाल्याचा दाखला.

------------------------------------
नांदेड: महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये अर्धापुर थेथील अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १००% विनियोग झाल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन मुख्याधिका-यांनी सादर करुन अपहार केला असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने पुराव्यासह जिल्हाधिकारी व संबंधीतांकडे देवून या प्रकरणी चौकशी करुन संबंधीताविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
येथील अग्निशमन दलाच्या इमारत बांधकामासाठी शासनाने सन २०१६-१७ मध्ये ६७ लाख ९४ हजार ६४० रुपायाचा निधी मंजूर केला होता. यात नगर पंचायतीचा २०% हिस्सा १६ लाख ९८ हजार ६६० रुपये मिळून ८४ लाख ८३ हजार ३०० रुपये निधीतून एक वर्षात सर्व अटीसह इमारत पुर्ण करणे बंधनकारक होते. परंतु इमारतीचे बांधकाम अद्याप अर्धवट स्थितीत बंद आहे. हे काम पुर्ण झाल्याचे दाखवून निधीचा १००% विनियोग झाल्याचे प्रमाण पत्र तत्कालीन मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी प्रशासनास सादर केले आहे.यावरुन या कामात अपहार झाल्याचे निदर्शनास येत आहे.
गतवर्षि दि.१८-०९-२०१८ रोजी शहराच्या फुले नगर भागातील एका घराला आग लागून एक महिला मृत्यूमुखी पडली होती. यावेळी येथे अग्निशमन दलाची व्यवस्था नसल्यामुळे नांदेडहून अग्निशमन दलाचे वाहन बोलवावे लागले होते.
येथे अग्निशमन दलाची व्यवस्था नसतानाही नगर पंचायत मालमत्ता धारकांकडून अग्निशमन कर वसूल करते.अनेक प्रकरणात माहितीच्या अधिकारात मागीतलेली कोणतीही माहिती नगर पंचायत कडून पुरविली जात नाही.
येथील नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून अनेक विकास कामांना निधी प्राप्त झाला होता.हि कामे शासकीय गुत्तेदाराच्या नांवे घेऊन मुख्याधिकारी व कांही नगरसेवकांनी संगनमत करुन निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.या प्रकरणी तक्रारी दाखल करुनही कार्यवाही होत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचा-यांना कोण पाठीशी घालत आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या प्रकरणी चौकशी करुन संबंधीताविरुद्ध कार्यवाही करावी असे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी(नपप्र), खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, मुख्याधिकारी अर्धापुर यांना दिले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.