ETV Bharat / state

भाजप-सेनेच्या कार्यकाळामध्ये राज्यावर फक्त नैराश्याची छाया पसरली - अशोक चव्हाण - nanded mahajanadesh rally

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अशोकाचे झाड सावली देत नाही अशी खरमरीत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुद्यावर लक्ष वेधत मुख्यमंत्र्यावर पलटवार केला.

अशोक चव्हाण
author img

By

Published : Sep 3, 2019, 4:07 AM IST

Updated : Sep 3, 2019, 5:38 AM IST

नांदेड - 'अशोका'चे झाड सावली देत नाही अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काय दिवे लावले ते आगोदर सांगावे. त्यांच्या काळातच राज्यात नैराश्याची काळी छाया पसरली आहे. असा पलटवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत केला.

अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद

हेही वाचा - आम्ही जिथे उभे राहू तेथून जिंकून येऊ - नारायण राणे

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांच्यावर अशोकाचे झाड सावली देत नाही अशी खरमरीत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी मुद्यावर लक्ष वेधत मुख्यमंत्र्यावर पलटवार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये दोन दिवस होते. त्यांच्या यात्रेबाबत चव्हाणांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही वाचा - अब्दुल सत्तारांच्या हाती 'शिवबंधन'; मातोश्रीवर केला सेनेत प्रवेश

चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतून शेतकरी, कर्मचारी, बेरोजगार यांना दिलासा तर मिळाला नाहीच, उलट यात्रेतून मुख्यमंत्र्यांना निरंकुश सत्तेमुळे आलेला अहंकार आणि विरोधकांबद्दल त्यांच्या मनात असलेला वैयक्तिक दोष याचे लोकांना दर्शन झाले. मुख्यमंत्री लोकांचे दर्शन घ्यायला नाही तर दर्शन द्यायला आले होते. या शब्दात चव्हाण यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले.

हेही वाचा - खोटे बोलण्यासाठी कुलभूषण यांच्यावर पाककडून दबाव, भारताचा आरोप

इसापूरचे पाणी इतरत्र वळविण्याची घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी शहरी आणि ग्रामीण जनतेत वाद निर्माण केला आहे. असेही अशोक चव्हाण म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने शेतकऱ्यांना ५९३ कोटी रुपयांना लुटले असल्याचा आरोप, चव्हाण यांनी केला. महाजनादेश यात्रा ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी पोलिसांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. मुख्यमंत्र्यांच्या या दडपशाहीचा मी निषेध करतो असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

Intro:मुख्यमंत्री महोदय... राज्यात तुम्ही काय दिले लावले ते अगोदर सांगावे...
अशोकराव चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यावर पलटवार

नांदेड - मला 'अशोका' चे झाड सावली देत नाही अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काय दिवे लावले ते पहिले सांगावे. त्यांच्या काळातच राज्यात काळी छाया पसरली आहे.असा पलटवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये दोन दिवस होते. त्यांच्या या यात्रेबाबत अशोकरावांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केलीBody:मुख्यमंत्री महोदय... राज्यात तुम्ही काय दिले लावले ते अगोदर सांगावे...
अशोकराव चव्हाण यांचा मुख्यमंत्र्यावर पलटवार

नांदेड - मला 'अशोका' चे झाड सावली देत नाही अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात काय दिवे लावले ते पहिले सांगावे. त्यांच्या काळातच राज्यात काळी छाया पसरली आहे.असा पलटवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये दोन दिवस होते. त्यांच्या या यात्रेबाबत अशोकरावांनी आज पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेतून शेतकरी, कर्मचारी, बेरोजगार यांना दिलासा तर मिळाला नाहीच. उलट या यात्रेतून मुख्यमंत्र्यांना निरंकुश सत्तेमुळे आलेला अहंकार आणि विरोधकांबद्दल त्यांच्या मनात असलेला वैयक्तिक दोष याचे मात्र लोकांना दर्शन झाले. मुख्यमंत्री फडणवीस लोकांचे दर्शन घ्यायला नाही तर दर्शन द्यायला आले होते. या शब्दात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण चव्हाण यांनी आज येथे मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले.
या महाजनादेश यात्रेतून केवळ मुख्यमंत्र्यांचा अहंकारच दिसून आला. असे नाही तर खोटे बोल पण रेटून बोल ही त्याची वृत्तीही त्यांनी केलेल्या खोट्या घोषणेतूनही दिसून आली.

ईव्हीएम यंत्रांच्या विश्वासार्हतेबल शंका घेणाऱ्याबाल मुरव्यमंत्र्यांनी जे उदगार काढले ते एका मुख्यमंत्र्यास शोभणारे नाहीत, असेही अशोकराव म्हणाले.

इसापूरचे पाणी इतरत्र वळविण्याची घोषणा करुन मुख्यमंत्र्यांनी शहरी आणि ग्रामीण जनतेत वाद निर्माण केला आहे. असेही अशोकराव चव्हाण म्हणाले.

नांदेड जिल्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी इ .स २०१७ - १८ मध्ये ४८ कोटी रुपये दिले. आणि शासनाने ५६३ दिले. म्हणजे विमा कंपनीस ६११ कोटी रुपये दिले आणि विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविम्यापोटी फक्त १८ कोटीच दिले. विमा कंपनीने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५९३ कोटी कोटी रुपयांना लुटले आहे, हे ही अशोकरावांनी निदर्शनास आणून दिले.

महाजनादेश यात्रा ज्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी पोलीस विरोधी पक्षाच्या नेत्यांना व युवा कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. मुख्यमंत्र्यांच्या या दडपशाहीचा मी निषेध करतो असेही अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले .

या पत्रकार परिषदेस आ.अमर राजूरकर, भाऊराव कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके, गोविंदराव पाटील नागेलीकर, संतोष पांडागळे , मुदजिबोद्दीनन हे उपस्थित होतेConclusion:
Last Updated : Sep 3, 2019, 5:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.