ETV Bharat / state

अर्धापूरमध्ये नवरीची घोड्यावरून मिरवणूक काढत दिला 'बेटी बचाव'चा संदेश

अर्धापूरमध्ये नवरीची वाजत-गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

author img

By

Published : Jan 7, 2021, 5:58 PM IST

नांदेड - विवाह सोहळा भव्यदिव्य करण्याचा प्रत्येकाचे स्वप्न असते. तसेच विवाह सोहळा जरा हटके व आठवणीत कसा राहिल, यासाठी विविध शक्कल लढवली जाते. विवाह म्हटले की मिरवणूक आलीच. पण ही मिरवणूक नवरदेवाची असते. सहसा नवरीची मिरवणूक काढण्यात येत नाही. पण याला अर्धापूर शहर अपवाद ठरले आहे. अर्धापूरमध्ये नवरीची वाजत-गाजत घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. यामधून स्त्री-पुरूष समानता, बेटी बचाव'चा संदेश देण्यात आला. त्यामुळे या विवाहाची चर्चा सगळीकडे होत आहे.

मुलगा-मुलगी समान

शहरातील फुले नगरातील स्वतंत्र सैनिक कुटंबातील डाके परिवाराने नवरीची घोड्यावरून मिरवणूक काढली. शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढून मुलगा-मुलगी समान, असा संदेश यावेळी देण्यात आला. त्यामुळे डाके कुटुंबाचे कौतुक होत आहे. तसेच 'बेटी बचाव बेटी पढाव' या अभियानाला चालना मिळाली आहे.

डाके कुटुंब ठरले अपवाद-

विवाह सोहळ्याला नवरदेवाची मिरवणूक सगळीकडे काढण्यात येते. मिरवणूक रंगतदार करण्यासाठी घोडा, जीप , पालखी, तुतारी भालेदार ,चौपदार याचा सोबत डीजे, आधुनिक तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. आतिषबाजी केली जाते. पण हा सर्व आटापिटा नवरदेवाच्या मिरवणुकीसाठी असतो. मात्र, नवरीचे मिरवणूक सभागृहात पालखीतून काढण्यात येते.

स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातील नवरी-

शहरातील फुलेनगरात मारोती डाके राहतात. त्यांचे वडील नागोजी डाके हे स्वतंत्र सैनिक होते. त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग नोंदविला होता. त्यांची नात श्रुतिका हिचा विवाह सागर जहिरव यांच्याशी आज (गुरुवार) आयोजित केला. या लग्नाच्या पुर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी वधूची मिरवणूक काढण्यात आली.

अर्धापुर शहरातून निघाली मिरवणूक-

मारोती डाके यांचे जुने घर शहरातील जुन्या वस्तीतील रामनगर भागात आहे. या जुन्या घराच्या आठवणीला उजाळा मिळावा. यासाठी वधू श्रुतिका व वर सागर जहिरव यांची मिरवणूक रामनगर, मारूती मंदिर या मार्गांनी फुलेनगरातील नवीन घरी गेली व सांगता करण्यात आली. ही मिरवणूक अर्धापूर शहरांत कुतूहल व कौतुकाचा विषय ठरला आहे, आशा प्रकारची नवरीची मिरवणूक प्रथमच काढण्यात आली आहे.

बेटी बचावचा संदेश-

मुलगा व मुलगी आम्ही समान मानतो. आत्ता पर्यंत नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आलेली पाहिली होती.आपल्या मुलीचीही मिरवणूक काढून बेटी बचाव, बेटी बचाव या अभियानाला चालना मिळावी व जुन्या आठवणीला उजाळा मिळावा. यासाठी मिरवणूक काढण्यात आली, अशी भावना नवरीची आजी बायनाबाई डाके यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- विशेष : आजही राज्यातील 80 हजारांहून गृहनिर्माण सोसायट्या 'कन्व्हेयन्स'पासून दूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.