ETV Bharat / state

नांदेडमध्ये पोलिसाचा ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत - In Nanded, the attempt of suicide by poisoning

मुखेड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार चंदर आंबेवार यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळी साडे अकराच्या दरम्यान विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यांच्यावर मुखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

नांदेडमध्ये पोलीसाचा ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत
author img

By

Published : Jul 20, 2019, 10:29 AM IST

नांदेड- मुखेड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार चंदर आंबेवार यांनी शुक्रवारी पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळी साडे अकराच्या दरम्यान विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यांच्यावर मुखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आंबेवार यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलिस कर्मचाऱ्यांत खळबळ माजली आहे. मुखेड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी वार्षिक तपासणी होती. यासाठी सरवदे आले होते. सकाळी तपासणी झाल्यानंतर आंबेवार यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे सांगत प्रचंड आरडाओरड केली. त्यानंतर सोबत आणलेले विषारी औषध प्राशन केले. मात्र, त्याच वेळी बाजूला असलेल्या पोलीस गाडीचे चालक यादव सोनकांबळे यांनी ते विषारी औषध त्यांच्या हातातून हिसकावले तरीही काही प्रमाणात ते औषध त्यांच्या पोटात गेले. यामुळे पोलीस नायक आंबेवार यांना तत्काळ उपजिल्हारुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

दरम्यान, सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांनी पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या उपस्थितीत पोलीस नायक चंद्रकांत आंबेवार यांना महिलांच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातील तपासाबाबत जाब विचारला असता अचानक संतप्त झालेल्या आंबेवार यांनी विष प्राशन करण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आंबेवार यांनी मागील एक वर्षापासून सरवदे हे मला वेळोवेळी मानसिक त्रास देत आहेत. तसेच पदोपदी अपमानित करून माझे खच्चीकरण करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. आज सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी माझा अपमान केला. या त्रासाला कंटाळूनच मी विष प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:
नांदेड : पोलीस कर्मचाऱ्याचा ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न.

नांदेड : मुखेड येथील पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार चंदर आंबेवार यांनी शुक्रवारी पोलीस स्टेशन
आवारात सकाळी साडे अकराच्या दरम्यान विष प्राशन केल्याची घटना घडली. त्यांच्यावर मुखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले
आहे.Body:
देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश
सरवदे यांच्या सततच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून आंबेवार यांनी विष प्राशन केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचारी-यात खळबळ माजली आहे.मुखेड पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी वार्षिक तपासणी होती.यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे आले होते. सकाळी तपासणी झाल्यानंतर पोलीस कर्मचारी चंद्रकांत
आंबेवार यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन
उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे
सांगत प्रचंड आरडाओरड केली. त्यानंतर सोबत आणलेले विषारी औषध प्राशन केले.मात्र त्याच वेळी बाजूला असलेल्या पोलीस गाडीचे चालक यादव सोनकांबळे यांनी ते विषारी औषध त्याच्या हातातून हिसकावले तरीही काही प्रमाणात ते औषध त्यांच्या पोटात गेले. यामुळे पो. नायक आंबेवार यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.Conclusion:
दरम्यान सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे यांनी पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या उपस्थितीत पोलीस नायक
चंद्रकांत आंबेवार यांना महिलांच्या मंगळसूत्र चोरी प्रकरणातील तपासाबाबत जाब विचारला असता अचानक संतप्त झालेल्या आंबेवार यांनी विष प्राशन करण्याचे पाऊल उचलल्याचे समजते. उपजिल्हा
रुग्णालयात उपचार सुरू असताना आंबेवार यांनी मागिल एक वर्षापासून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सरवदे हे मला वेळोवेळी मानसिक
त्रास देत आहेत. तसेच पदोपदी अपमानित करून माझे खच्चीकरण करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. आज सर्व कर्मचा-यांच्या उपस्थितीत त्यांनी माझा अपमान केला. या त्रासाला कंटाळूनच मी विष
प्राशन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.